तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न’ पुरस्कार जाहीर

तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न’ पुरस्कार जाहीर

नवीमुंबई (मंगेश जाधव )

गुहागर तालुक्यातील तळवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने उत्कृष्ट आरोग्य सेवा देत राज्यस्तरावर मानाचा तुरा रोवला असून या केंद्राला प्रतिष्ठेचा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे संपूर्ण गुहागर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

हा पुरस्कार मुंबई येथील आरोग्य भवनमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांमधून प्रत्येकी एका उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली असून त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली आहे.

तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राने ग्रामीण भागात दर्जेदार व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देत उल्लेखनीय कार्य केले आहे. आरोग्य सुविधा, रुग्णसेवा, लसीकरण, जनजागृती आणि विविध आरोग्य उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी या निकषांवर केंद्राने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे.

या यशामध्ये डॉ. सुप्रीम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व सहाय्यक कर्मचाऱ्यांनी एकजुटीने केलेल्या परिश्रमांचा मोठा वाटा आहे.

हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वर्गावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. ग्रामीण भागात उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्याच्या त्यांच्या कार्याची ही राज्यस्तरीय पावती असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें