शंभू स्पोर्ट्स मनोर पालघर यांस कडून कुडली नं.03 शाळेला स्पोर्ट ड्रेसचे वितरण

शंभू स्पोर्ट्स मनोर पालघर यांस कडून कुडली नं.03 शाळेला स्पोर्ट ड्रेसचे वितरण

आबलोली (संदेश कदम)
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कुडली नं. 03 तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या शाळेतील शिक्षकांनी व ग्रामस्थांनी गुणवत्ता वाढीसाठी आनंददायी शैक्षणिक परिसर निर्माण करण्यासाठी शाळेमध्ये सुमारे 16 लाख रुपयांचा फार मोठा शैक्षणिक उठाव करून शाळेचा कायापालट केलेला आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून या शाळेची होणारी प्रसिद्धी पाहून शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदेश सावंत यांचे मित्र शंभू स्पोर्ट्स मनोर पालघर चे मालक श्री संतोष सुकाळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक असणारा स्पोर्ट ड्रेस या शाळेला भेट म्हणून दिलेला आहे.शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी होत असणारा प्रयत्न आणि सुसज्ज सुंदर असा परिसर करण्यासाठी पालकांनी केलेली मेहनत पाहून आपलाही हातभार या शाळेला लागावा. अशी इच्छा शंभू स्पोर्टचे मालक श्री संतोष सुकाळे यांनी व्यक्त केली आणि या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा स्पोर्ट ड्रेस असावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचे वितरण केले. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री राजेश वनये,उपाध्यक्षा सौ.संजीवनी थोरसे या गावचे माजी उपसरपंच गुरव श्री. शांतारामजी थोरसे, शाळेचे मुख्याध्यापक श्री संदेश सावंत उपशिक्षक श्री.महेश खारतोडे पदवीधर शिक्षक श्री. गणेश पाडवी व विद्यार्थी यांनी देणगीदारांचे आभार व्यक्त केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें