माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं.बापट कनिष्ठ महाविद्यालयात ‘शिवजयंती’ उत्साहात साजरी .

माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं.बापट कनिष्ठ महाविद्यालयात ‘शिवजयंती’ उत्साहात साजरी .

रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे     

दि . १९ फेब्रुवारी २०२६

वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संचलित माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं. बापट कनिष्ठ महाविद्यालयात ‘शिवजयंती’ उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक प्रा.श्री. शिवाजी जगताप , प्रा.श्री प्रल्हाद सरगर क्रिडा शिक्षक डॉ श्री.राजेश जाधव व प्रमुख वक्ते श्री सूवेश चव्हाण यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर शाळेतील विद्यार्थी कु.आराध्या कोलंबेकर, शौर्य चव्हाण,प्रणव रसाळ, तनिक्षा मुर्ले, आर्या गोरे, तन्वी मोहित, सना रेड्डी, मोक्षद जाधव,आर्या पावसकर, संस्कृती निंबरे,कु.सायली मांजरेकर यांनी शिवाजी महाराजांविषयी अतिशय सुंदर माहिती आपल्या मनोगतातून कथन केली. कुमार . कौशल पवार आणि त्याचे सहकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या गीतांचे गायन केले.

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री.सूवेश चव्हाण यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ व सद्यस्थिती यांची सांगड घालून विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली. त्यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहास विद्यार्थ्यांना उलगडून दाखवला शिवरायांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व कोणताही जातीभेद न करता कशाप्रकारे राज्य चालविले याची माहिती विषद केली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रा.श्री. शिवाजी जगताप यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख श्री.प्रभाकर धोपट यांनी केले.यावेळी मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचा शेवट शिवाजी महाराज यांचे विचार जनमानसात पोहोचविण्यासाठी विविध घोषणा व नारे देत गौरवपर प्रभातफेरी काढून करण्यात आला….

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें