चिपळूणमध्ये ACBचा सापळा; PSIसह खाजगी व्यक्तीविरुद्ध गुन्हा

crim

🚨 चिपळूणमध्ये ACBचा सापळा; PSIसह खाजगी व्यक्तीविरुद्ध गुन्हा

चिपळूण: तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र (ACB) कडे तक्रार दाखल केल्यानंतर चिपळूण येथे सापळा रचण्यात आला. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक (PSI) मनीष कांबळे यांनी थेट लाच स्वीकारण्याऐवजी ती रक्कम खाजगी व्यक्तीमार्फत घेण्याची व्यवस्था केल्याचे तपासात उघड झाले आहे.

तपासानुसार, PSI कांबळे यांनी अभिजीत शिर्के या खाजगी व्यक्तीला पानटपरीवर लाचेची रक्कम स्वीकारण्यास सांगितले होते. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने १५ हजार रुपये दिल्यानंतर ACBच्या पथकाने अभिजीत शिर्के याला रंगेहाथ पकडले.

चौकशीदरम्यान ही रक्कम PSI मनीष कांबळे यांच्या सांगण्यावरून स्वीकारण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती ACBच्या सूत्रांनी दिली आहे.

या प्रकरणी PSI मनीष कांबळे आणि अभिजीत शिर्के यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ACBकडून पुढील तपासात आणखी बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें