अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचा दावा; ट्रम्प-नेतान्याहूंच्या विधानाने खळबळ इराणने फेटाळला मृत्यूचा दावा; मध्यपूर्वेत तणाव शिगेला

highlight

Israel vs Iran War: अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचा दावा; ट्रम्प-नेतान्याहूंच्या विधानाने खळबळ

इराणने फेटाळला मृत्यूचा दावा; मध्यपूर्वेत तणाव शिगेला

जगाचं लक्ष लागून राहिलेल्या इस्रायल–इराण संघर्षाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते Ali Khamenei यांचा अमेरिका–इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान Benjamin Netanyahu यांनी केला आहे. त्यांच्या कार्यालयाजवळ तसेच निवासस्थान परिसरात क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे.

या घोषणेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनीही दुजोरा दिला. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी खामेनी यांच्या मृत्यूचा उल्लेख करत, हा जगासाठी न्याय असल्याचे म्हटले. इराणी जनतेसाठी देश परत मिळवण्याची ही मोठी संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मात्र, इराणने हा दावा ठामपणे फेटाळला आहे. खामेनी जिवंत असून युद्धस्थितीवर लक्ष ठेवत असल्याचे इराणी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांचा दावा हा दिशाभूल करणारा आणि इराणविरोधी कटाचा भाग असल्याचा आरोप तेहरानकडून करण्यात आला आहे.


युद्धाची पार्श्वभूमी काय?

अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतांवरून वाढला वाद

२०२५ पासून इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतांच्या विस्तारावरून इस्रायलने वारंवार इशारे दिले होते. इराणने हे इशारे नाकारत आपला कार्यक्रम सुरूच ठेवल्याचा आरोप आहे. त्यानंतर तेहरानसह काही महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले झाल्याचे वृत्त आहे.

या घडामोडींमुळे मध्यपूर्वेत तणाव पुन्हा वाढला असून जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिस्थिती अत्यंत संवेदनशील असून अधिकृत पुष्टी आणि आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया येणे बाकी आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें