मध्यपूर्वेतील तणावामुळे डीजीसीएचा उड्डाण सल्ला जारी २ मार्च २०२६ पर्यंत विशेष सतर्कतेचे निर्देश; EASAच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्णय

breaking

✈️ मध्यपूर्वेतील तणावामुळे डीजीसीएचा उड्डाण सल्ला जारी

२ मार्च २०२६ पर्यंत विशेष सतर्कतेचे निर्देश; EASAच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्णय

मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर Directorate General of Civil Aviation (डीजीसीए) ने भारतीय विमान कंपन्यांसाठी सुरक्षा सल्ला जारी केला आहे. इस्रायल, लेबनॉन, युएई, सौदी अरेबिया, बहरीन, ओमान, इराक, जॉर्डन, कुवेत आणि कतार या देशांच्या हवाई क्षेत्रात उड्डाण करताना विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिस्थितीचा नियमित आढावा घेतला जाणार असून, नवीन आदेश न आल्यास हा सल्ला २ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. हा निर्णय European Union Aviation Safety Agency (EASA) च्या संघर्ष क्षेत्र बुलेटिननुसार घेण्यात आला आहे.


🌍 इस्रायल-इराण संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम

कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता; भारतावरही होऊ शकतो परिणाम

Iran आणि Israel यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली आहे. इराण हा प्रमुख तेल उत्पादक देश असल्याने युद्ध अधिक भडकल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेल दरांवर आणि महागाईवर होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, या परिस्थितीत शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळू शकतात. गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीकडे वळू शकतात, ज्यामुळे या धातूंच्या किमती ऐतिहासिक पातळीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें