सुपर किंग्स उभेपाटवाडी ठरला वाटद चॅम्पियन चषक पर्व 5 चा महाविजेता…

सुपर किंग्स उभेपाटवाडी ठरला वाटद चॅम्पियन चषक पर्व 5 चा महाविजेता…

 

रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे

शिमगोत्सवाच्या निमित्ताने वाटद मिरवणे गाव मर्यादित एक वाडी क्रिकेट स्पर्धा दरवर्षी वाटद गावामध्ये खेळवली जाते. मानाची समजली जाणारी ही स्पर्धा चव्हाटेश्वर क्रिकेट संघ कवठेवाडी च्या आयोजनामध्ये संपन्न झाली. वाटद मधील अनेक एक वाडी संघांमध्ये चुरशीच्या वातावरणामध्ये सामने संपन्न झाले.. शेवटी जेतेपदासाठी झालेल्या अंतिम सामन्यात सुपर किंग्स उभेiपाटवाडी विरूध्द मराठा वॉरियर्स आवाडवाडी यांच्यामध्ये रंगला.. भावेश शितप, अमित बारगोडे, हेमंत शितप, विपुल शीतप यांनी केलेल्या उत्तम खेळाच्या जोरावर उभेपाटवाडी संघाने आवडवाडी संघावर मात करत पर्व 5 चा मानाचा चषक उंचावला…

संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करत भावेश शितप त्याला मालिकावीराचा चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून मराठा वॉरियर्स संघाचा अभय ढवळे तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून उभेपाटवाडी संघाचा हेमंत शितप त्यांना गौरवण्यात आले…

या स्पर्धेचे उत्तम आयोजन चव्हाटेश्वर क्रिकेट संघ कवठेवाडी यांनी केले…

या यशाबद्दल उभेपाट वाडी संघाचे अभिनंदन सर्वत्र करण्यात येत आहे.*

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें