पालखी भेटीने तिन्ही बहिणीच्या गळाभेटीने रंगतो आबलोलीतील शिमगोत्सव

पालखी भेटीने, तिन्ही बहिणींच्या गळाभेटीने रंगतो आबलोलीतील शिमगोत्सव

आबलोली (संदेश कदम)

कोकण आणि शिमगोत्सव यांचं अनोखं नातं आहे. गुहागर तालुक्यातील आबलोली येथे आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता श्री. नवलाई देवी यांच्या पालखी भेटीचा, तिन्ही बहिणींच्या गळा भेटीचा सोहळा रंगताना दिसला याच गळाभेटीने आबलोलीतील शिमगोत्सव उत्साहात, शांततेत व फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात आनंदाने साजरा करण्यात आला .हा सोहळा प्रत्यक्ष पाहताना डोळ्याचे पारणे फिटल्याचा अनुभव प्रत्यक्ष पाहायला मिळाला. नवलाई देवींची गळाभेट होताना दोन्ही पालखींच्या आतील नारळांची आपो – आप अदलाबदल होते. अशी आख्यांकीका सांगण्यात येते. अबलोली खालील पागडेवाडी येथील जे – जे मानकरी १) रमेश गोणबरे,२) प्रमोद गोणबरे,३) राजेश गोणबरे,४) दिलीप गोणबरे,५) सुरेश गोणबरे,६) शंकर गोणबरे नऊ दिवस नवलाई देवीच्या नावाने श्रद्धापूर्वक कडक उपवास करतात ते मानकरी नवलाई देवीच्या पालखी समोर सहानेवर धारदार शस्त्राने स्वतःच्या अंगावर हाणून घेतात मात्र यावेळी कसल्याही प्रकारची इजा होत नाही किंवा साधे खर्चतही नाही किंवा रक्तही येत नाही एकूणच हा पालखी भेट, गळाभेट सोहळा भक्तांसाठी, भाविकांसाठी नेत्र सुख असते या पालखी भेट, गळाभेट सोहळ्याला आबलोली – खोडदे पंचक्रोशीतील जनता बहुसंख्येने उपस्थित होती.

फाल्गुन पौर्णिमेच्या सकाळी सूर्योदयाबरोबर आबलोली – खोडदे येथील होम पेटवले जातात परंतु यावर्षी नेमके ग्रहण असल्याने दिनांक ०३ मार्च २०२६ ऐवजी दिनांक ०४ मार्च २०२६ रोजी पहाटे ०६:३० वाजता होम पेटवण्यात आले. आणि दुपारनंतर आबलोली येथील श्री. नवलाई देवी, खोडदे सहानेची वाडी येथील श्री. नवलाई देवी ,खोडदे गणेशवाडी येथील श्री. नवलाई देवी. या तिन्ही पालख्या, तिन्ही बहिणी आपल्या लाडक्या भावाला म्हणजे गोपाळजीला भेटून आल्यानंतरच आबलोली येथील कै. दादा कारेकर यांच्या जागेतील मैदानावर नाचविण्यात येतात. याच वेळी दुपारनंतर सहाने वर जत्राही भरते देवींच्या दर्शनानंतर भावीक, नागरिक व लहान मुले जत्रेत खरेदी करतात. विशेष म्हणजे आबलोली येथील श्री. नवलाई देवीच्या पालखीला खोडदे येथील श्री. नवलाई देवीच्या पालख्या क्रमाक्रमाने भेटतात या बहिणींची गळाभेट होताना या देवतांमध्ये बहिणीचं नातं असल्याने ग्रामस्थ आवर्जून सांगतात यावेळी दोन्ही गावातील लोक आपल्या खांद्यावर पालखी वाहून नेणाऱ्या भक्तांना उचलून घेतात आणि गावातील ग्रामस्थांच्या खांद्यावर उभे असलेल्या ग्रामस्थांच्या खांद्यावरील पालख्या वाजत – गाजत ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या अतिष बाजीत एकमेकांची गळाभेट करतात व पालख्यांची ही गळाभेट होते. यावेळी दोन्ही पालकांची, दोन्ही बहिणींची गळाभेट होताना आतील नारळांचीही अदलाबदल होते. अशी आख्यांकीका आवर्जून सांगितली जाते. आबलोली – खोडदे येथील पालख्यांची, दोन्ही बहिणींची गळाभेट होत असताना खोडदे येथील दुसरी पालखी एका बाजूस ग्रामस्थ नाचवीत असतात. पहिली पालखी भेटून निघून गेल्यावर दुसरी पालखी आबलोलीच्या ग्रामदेवतेला भेटते. अतिशय शिस्तबद्ध उत्साहात हा सोहळा पार पडतो. आबलोलीतील कै. दादा कारेकर यांच्या जागेतील मैदानावर रंगणारा हा पालखी भेट, गळाभेट सोहळा आधुनिक युगातही तितकाच संस्मरणीय ठरतो आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें