शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल फाउंडेशनचा पुढाकार; १९ मान्यवरांचा विशेष सत्कार

तळवली (प्रतिनिधी – मंगेश जाधव):

गुहागर तालुक्यातील स्थानिकांचे होणारे स्थलांतर थांबवून, ग्रामीण भागात लघु उद्योगांची साखळी निर्माण करण्याच्या उद्देशाने शृंगारतळी येथे “अवेरे ज्ञान प्रबोधिनी” या हॉलचे शानदार उद्घाटन करण्यात आले. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, गुरुवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजता गुहागर पंचायत समितीचे सभापती मा. प्रणवजी पोळेकर यांच्या हस्ते या हॉलचे फित कापून लोकार्पण करण्यात आले.

दशभुजा सोशल फाउंडेशनच्या वतीने वकील सुशील सुगंधा गणपत अवेरे यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या प्रबोधिनीच्या माध्यमातून तालुक्यातील तरुणांना व महिलांना विविध ज्ञान सत्रे आणि तांत्रिक प्रशिक्षणासाठी माफक दरात हॉल उपलब्ध होणार असून, यामुळे स्वयंरोजगाराला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

१९ मान्यवरांचा गौरव

या विशेष दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १९ मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये खालील मान्यवरांचा समावेश होता:

* राजकीय व सामाजिक नेतृत्व: सभापती प्रणव पोळेकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. नेत्राताई ठाकूर, महेश नाटेकर, माजी सभापती सुनील पवार, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, नगरसेवक अमोल गोयथळे, स्वीकृत नगरसेवक अमरदीप परचुरे, सरपंच विजय तेलगडे.

* व्यापारी व उद्योजक: प्रमोदशेठ गांधी, राजनभाई दळी (कृपा हेअर टॉनिक), अजित शेठ बेलवलकर (व्यापारी संघटना अध्यक्ष), अमरनाथ मोहिते (अमर कॅश्यू), अशोक मोहिते.

* व्यावसायिक व पत्रकार: पत्रकार दिनेश चव्हाण, गणेश किर्वे, वकील संतोष आग्रे, डॉ. राजेंद्र पवार, अर्जुन अवेरे, दिनेश सोलकर, लवेश सोलकर, वकील प्रसाद जांगळे, रियाज ठाकूर, दिगंबर मेस्त्री व पाटील.

मान्यवरांचे मनोगत आणि शुभेच्छा

कार्यक्रमात बोलताना सभापती प्रणव पोळेकर यांनी अवेरे कुटुंबाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. “स्थानिक स्तरावर प्रशिक्षणाची सोय झाल्यामुळे गुहागरमधील तरुणांना रोजगारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी महेश नाटेकर, अजित शेठ बेलवलकर, सुनील पवार आणि राजनभाई दळी यांनीही आपले मनोगत व्यक्त करत फाउंडेशनच्या भविष्यातील उपक्रमांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी अवेरे कुटुंबाचा विशेष सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील सुशील अवेरे यांनी केले, तर सूत्रसंचालन अमर मोहिते यांनी प्रभावीपणे पार पाडले.


RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें