रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

google credit

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाकणकर यांनी आपला राजीनामा काल रात्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केल्याचे समजते. यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

तसेच, हा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांनी मागितल्याचीही चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणामुळे आधीच वातावरण तापलेले असताना या नव्या घडामोडींमुळे राजकारण आणखी ढवळून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधकांकडून या प्रकरणावर टीका केली जात असून, सत्ताधारी बाजूकडून अद्याप स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही.

सध्या तरी चाकणकर यांचा राजीनामा हा चर्चेचा विषय असून, अधिकृत घोषणा व पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें