गुहागरमध्ये अवैध शिकारीवर वनविभागाची मोठी कारवाई; मृत रानडुक्कर व बंदुकीसह तिघे जेरबंद

गुहागरमध्ये अवैध शिकारीवर वनविभागाची मोठी कारवाई; मृत रानडुक्कर व बंदुकीसह तिघे जेरबंद

गिमवी येथे रात्री उशिरा छापा; विना नंबर ४०७ टेम्पोतून १२ बोर बंदूक जप्त, वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल

गुहागर (प्रतिनिधी):

गुहागर तालुक्यातील गिमवी गावात अवैध शिकारीविरोधात वनविभागाने धाडसी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई २३ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे १०:३० वाजता करण्यात आली.

 

वनविभागाच्या पथकाला गिमवी गावाच्या हद्दीत विना नंबर प्लेटचा ४०७ टेम्पो संशयास्पद अवस्थेत उभा असल्याचे आढळले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये एक मृत रानडुक्कर तसेच शिकार करण्यासाठी वापरण्यात आलेली १२ बोरची डबल बॅरल बंदूक मिळून आली.

या प्रकरणी प्रसाद सुभाष सोम, रोशन रमेश मोरे आणि संदीप वसंत गावडे (सर्व रा. गिमवी) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वन परिक्षेत्र अधिकारी सरवर खान, वनपाल अमित निमकर, एस. एस. सावंत तसेच वनरक्षक सिद्धेश्वर गायकवाड, अरविंद मांडवकर, कुमार पवार, राहुल गुंठे आणि कृष्णा इरमले यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली.

वनविभागाच्या या कारवाईमुळे अवैध शिकारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें