सम्यक कोकण कला संस्था गुहागर शाखेचा रौप्यमहोत्सव; ५० कलावंतांचा भव्य सन्मान सोहळा २८ मार्चला

सम्यक कोकण कला संस्था गुहागर शाखेचा रौप्यमहोत्सव; ५० कलावंतांचा भव्य सन्मान सोहळा २८ मार्चला

२५ वर्षांच्या प्रवासाचा गौरव – नवोदित आणि दुर्लक्षित कलावंतांना व्यासपीठ देणाऱ्या संस्थेचा विशेष उपक्रम

📍 गुहागर | तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)

सम्यक कोकण कला संस्था (रजि.), महाराष्ट्र या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गुहागर शाखेच्या वतीने ५० कलावंतांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी भवानी सभागृह, शृंगारतळी (पालपेणे रोड) येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी बाळकृष्ण पवार (गुरुजी) उपस्थित राहणार आहेत. गुहागर तालुक्यातील परचुरी गावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध कवी-गायक महेश गमरे (महेश बाबू) यांच्या प्रेरणेतून या संस्थेची स्थापना झाली असून गेल्या २५ वर्षांत संस्थेने अनेक गुणी कलावंत घडविले आहेत.

संस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रसिद्धीपासून दूर असलेल्या कलाकारांना शोधून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच नवोदितांना संधी देणे आणि गरजू कलाकारांना मदतीचा हात देणे हे राहिले आहे. विविध कलाक्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या कलाकारांचा गौरव करून त्यांच्या कलेला चालना देण्याचे कार्यही संस्था सातत्याने करत आहे.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन गुहागर शाखेचे सचिव उत्तम पवार (तळवली) करणार आहेत. कार्यक्रमासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयातून संस्थेचे अध्यक्ष मंदार कवाडे, कार्याध्यक्ष भगवान साळवी, चिंतामण जाधव, सचिव नरेश शिंदे, कोषाध्यक्ष सुरेश सावंत यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष मोहिते, दीपक गमरे, मिलिंद कदम, भीमसेन सावंत, सुरेश जाधव, प्रविण पवार, अविनाश गमरे आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

गुहागर तालुक्यातील सर्व कलावंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

👉

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें