आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल
राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग विभागीय संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आल्याने तालुक्यातील शिवसेनेत आनंदाचे वातावरण आहे या नियुक्तीचे स्वागत करत पदाधिकारी व शिवसैनिकांनी सोशल मीडियावर अभिनंधनाचा वर्षाव केला आहे. एक सक्षम संघटक म्हणून ओळख असलेल्या आमदार सामान यांच्या नेतृत्वाखाली राजापूर तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी भक्कम झाली आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने तालुक्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली असून यामुळे शिवसेना शिंदे गट अधिक बळकट होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामान यांचे सर्व स्तरातून जोरदार अभिनंदन करण्यात येत आहे व सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें