ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात आलेले वक्तव्य ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे व बिनबुडाचे असल्याचा आरोप करत इतिहास अभ्यासक लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधितांनी तात्काळ आपले वक्तव्य मागे घेऊन मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 

शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा तर छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी होत्या. त्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या असून मोहिते घराणे हे मराठा सरदार घराणे म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. तसेच सोयराबाई या हंबीरराव मोहिते यांच्या बहिणी व शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या.

 

याशिवाय, हंबीरराव मोहिते व सोयराबाई यांच्या आईसाहेब या राजे शिर्के घराण्यातील असल्याने त्यांचे आजोळही शिर्के घराण्याशी संबंधित होते, असेही शिर्के यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ताराराणींची सामाजिक व ऐतिहासिक ओळख मराठा परंपरेशी घट्ट जोडलेली असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

इतिहासाचा अभ्यास करताना ठोस पुरावे आणि प्रामाणिक संदर्भ आवश्यक असतात. कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीबाबत बिनबुडाचे दावे केल्यास समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे संबंधितांनी जबाबदारीने भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें