कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम

.
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात दिनांक १ व २ एप्रिल २०२६ रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी अभिषेक, श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी महिलांचे हळदीकुंकू समारंभ, स्थानिक भजन, रात्री १०.३० वा. सुधीर भायनाक लिखित, दिनेश बागकर दिग्दर्शित श्री हनुमान नाटय मंडळ कोतळूक उदमेवाडीचे रात्रीस खेळ चाले हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. गुरूवार दिनांक ३ एप्रिल रोजी पहाटे स्थानिक भजन, सकाळी ६.३३ वा. श्रींचा जन्मोत्सव, आरती, प्रसाद, दुपारी १.३० वा. ह. भ.प. डॉ. श्री. श्रीपाद जोगळेकर हेदवी यांचे किर्तन, सायंकाळी ५ वा. श्रींची पालखीतून मिरवणूक, रात्री १० वा. गुणवंत व मान्यवरांचा सत्कार, रात्री १०.३० वा. श्री वरदान वाघजाई नाटय नमन मंडळ माभळे जाधववाडी तालुका संगमेश्वर यांचे बहुरंगी नमन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून बहुसंख्येने भक्तगणांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उदमेवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष समीर ओक, महिला मंडळ अध्यक्ष सौ. मेघा महाडीक यांनी केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]