अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

 

अकोला : आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे घरगुती गॅस पुरवठ्यातील तुटवडा गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्जाबर गावमौजे येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव सिरसाठ यांचा घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सोशल मीडियावर प्रसिद्ध केली गेली आहे.

 

माजी सरपंचांचे निधन सुमारे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झाले. यामुळे पुणे-पिंपरी चिंचवडसारख्या शहरांमध्ये अशी गंभीर समस्या निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने नियोजन करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

 

तसेच, आदेश न घेतल्यास आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महिला अध्यक्ष शारदा बनसोडे, महासचिव संजीवन कांबळे, उपाध्यक्ष धनंजय कांबळे, संघटक संतोष कसबे, सचिव कुसुम गवळी, युवा उपाध्यक्ष राहुल बनसोडे आदी उपस्थित होते.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें