आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

नवीमुंबई (मंगेश जाधव)-प्राथमिक जिल्हा परिषद शाळा, निळे गाव, नालासोपारा पश्चिम* येथे आज दिनांक 20 एप्रिल रोजी पार पडला. सदर कार्यक्रमासाठी आपल्या पालघर जिल्ह्यातील डॉ रोहन सोनवले, डॉ सुजाता सोनावले, शिक्षक सुखलाल पाटील, शोभा वाघमारे ताई आणि ॲड अदिती विनायक पवार उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत शालेय साहित्य वाटपाचे कार्य पार पडले

 

ॲड. आदिती पवार यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. महापुरुषांच्या कामाची थोडक्यात ओळख करून दिली.

डॉ. सुजाता सोनावले यांनी विद्यार्थ्यांनी दातांची काळजी कशी घ्यावी यावर मागदर्शन केले. डॉ. रोहन सोनावले यांनी वर्षभर विद्यार्थ्यांना मोफत दंतउपचार करून देण्याचे जाहीर केले

सुखलाल पाटील यांनी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी *आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर* चे कार्यकर्ते सदैव हजर आहेत असे स्पष्ट केले.

 

शाळेच्या मुख्याध्यापिका अल्बिना फरोज यांनी *आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर* च्या कामाचे कौतुक केले आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी शाळा सदैव उपलब्ध राहील असे सहकार्याचे आश्वासन दिले.

 

या कार्यक्रमासाठी आदरणीय डॉ रोहन सोनवले आणि सुखलाल पाटील दादा यांनी गेल्या काही दिवसांपासून कार्यक्रमाच्या नियोजनासाठी खूप धावपळ केली यासाठी त्यांचे खूप खूप आभार.

शोभा वाघमारे ताई आणि डॉ सुजाता सोनावले आणि ॲड अदिती विनायक पवार यांचे सुद्धा आभार तसेच पालघर मधील आपले कार्यकर्ते पत्रकार प्रेमानंद पालवे सर यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडून अनुमती पत्रक आणण्यासाठी खूप धावपळ केली त्यासाठी त्यांचे विशेष आभार. तसेच शाळेतील मुख्याध्यापिका व इतर शिक्षिका यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें