खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,

महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

 

*प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा व*

*सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*

आबलोली (संदेश कदम)

चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती खेरशेत शाखा, धम्मभूषण विकास संघ मुंबई, यशोधरा महिला मंडळ, सम्यक युवा मंच यांच्यावतीने दि.१३,१४,१५ मे २०२६ रोजी तक्षशिला बुद्ध विहार खेरशेत येथे भगवान गौतम बुध्द, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छ. शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव व तक्षशिला बुद्ध विहाराचा वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रबोधनपर व्याख्यानांसह धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी या कार्यक्रमात पहावयास मिळणार आहे.

बुद्ध पूजापाठ, धम्म ध्वजारोहण, भिक्खू संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस, भन्ते डॉ. ए. सुमेधबोधी यांचे प्रवचन, मिरवणूक, बुद्ध विहारासाठी व शाखेसाठी योगदान देणाऱ्या पदाधिकारी व सभासदांचा सत्कार, विद्यार्थ्यांचा गुणगौरव, जाहिर सभा, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन, गीतगायन, बक्षीस वितरण, फनी गेम्स, पाली अभ्यासक प्रा. विजय मोहिते, बहुजन विकास आघाडीचे सुरेश भायजे, शिवश्री महेंद्रसिंग जालगावकर, शिवश्री प्रदीप कांबळे, कु.असित सुर्वे, बौद्ध उपासक क्रांतीताई कदम, अॅड. विभावरीताई रजपूत यांची व्याख्याने, मुंबई येथील भीमप्रेरणा संगीत कलापथकाचा ‘जीवनाचा संघर्ष’ कार्यक्रम, खेरशेत येथील महिला पुरस्कृत स्त्री भ्रूणहत्या नाटीका आदी कार्यक्रम होणार आहेत.

स्थानिक शाखेचे अध्यक्ष सुनिल कदम, मुंबई संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम, महिला मंडळाच्या अध्यक्षा शैला कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शेखर निकम, आमदार भास्करशेठ जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती मुंबई मुख्य कमिटीचे अध्यक्ष विठोबादादा पवार, स्थानिक कमिटी अध्यक्ष चंद्रकांत सावंत, संस्थेचे सावर्डे विभाग अध्यक्ष काशीराम कदम गुरुजी, कुशिवडे गावचे सरपंच सिद्धार्थ कदम, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, पंचायत समिती सदस्य उज्वलाताई घाग-साळवी, नगरसेविका नीलम जाधव, रत्नागिरीचे नगरसेवक नितीन जाधव, पंचायत समिती सदस्य सुभाष जाधव, गुहागर नगर पंचायतीच्या महिला व बालकल्याण सभापती नमिताताई बाटले तथा विदिशा दणदने आदींसह युवा अध्यक्ष आकाश कदम व स्थानिक आणि मुंबई शाखेचे पदाधिकारी, महिला आणि पुरुष सभासद उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गाव आणि मुंबई शाखेचे पदाधिकारी मेहनत घेत आहेत

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]