ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

rv ad

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी….।*


समिर शिरवडकर-रत्नागिरी.

राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी हे तब्बल ४ ते ५ वर्षे प्रभारी राहून, ठेकेदाराना मात्र चांगलेच सांभाळून घेत आहेत असे चित्र सध्या राजापूर तालुक्यात दिसत आहे.तालुक्यातील अनेक तक्रारी जसे की रस्ता,गटार,शाळा दुरुस्ती, नाले, पूल,साकव व अन्य विकास कामाबाबत येत असतात मात्र कित्येक महिने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उंबरठे ,पत्रव्यवहार आणि प्रभारी यांना फोन द्वारे कळीत करून देखिल त्याची पाहणी किव्हा त्यावर पत्रव्यवहार होत नाही,तर त्या प्रभारी महाशयांना ठेकेदार यांना आगाऊ त्यांच्या वेळेनुसार किंव्हा त्यांच्या मनमानी नुसार वेळ किव्हा पाहणी दौरा करावा लागत आहे.लोकांचे सेवक लोकांचे जणू मालक बनले आहेत.
राजापूर तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत दळे हे एक उदाहरण आहे या परिसरात जनसुविधा माध्यमातून ५ ते ६ कामे चालू आहेत यात काही परिपूर्ण झाली आहेत,यात ग्रामस्थांनी ठेकेदार दीपक पवार यांचा कामाबद्दल तक्रार दिली होती त्या तक्रारींबद्दल आज तागायय काहीही पहाणी नाही, याऊलट वारंवार पाठपुरावा करूनही मिस्टर प्रभारी याची काही दखल घेत नाही.याचाच अर्थ हे प्रभारी महाशय जणू ठेकेदारांचे तारणहार आहेत,असे म्हटले तर वावग ठरणार नाही.या आधी मा. आमदार किरण भैय्या सामंत यांच्यासोबत एका मागिल बैठकीत याच प्रभारी आणि ठेकेदार दीपक पवार याना रस्ते भूमिपूजन बाबतीत सुद्धा ताकीद दिली होती ,तरी अजूनही हे ठेकेदार महोदय जणू बांधकाम विभाग हे आपलं काही वाकड करू शकणार नाही असे समजत आहे.ह्याची प्रचिती ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष सन्मा.आशपाक हाजु ना देखील आले आहे.अश्या या मुजोर ठेकेदाराला प्रभारी महोदय का पाठीशी घालत आहे, हे कारण आणूनही समजले नाही..जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि ठेकेदार संघटना यावर काही मार्ग काढतील का ? हे आत्ता पाहावे लागणार आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें