डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला नवा आदर्श; गुणवंत विद्यार्थिनीच्या सत्कार सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती

नवी मुंबई (मंगेश जाधव) :

शिक्षणाची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेल्या डोंबिवली शहराने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. डोंबिवली येथील IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी जान्हवी वरदा वरुण कुलकर्णी हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या SSC परीक्षा २०२६ मध्ये तब्बल १०० टक्के गुण मिळवत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. तिच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

जान्हवीच्या यशामागे तिची मेहनत, जिद्द, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांचा मोठा वाटा असून, आई सौ. वरदा वरुण कुलकर्णी आणि वडील श्री. वरुण गजानन कुलकर्णी यांनी दिलेले संस्कार व मार्गदर्शनही तितकेच मोलाचे ठरले आहे.

 

विद्यार्थिनीच्या या उल्लेखनीय यशामध्ये IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाचे शैक्षणिक वातावरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि समर्पित शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. विद्यालयाने विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, अभ्यासाची आवड आणि गुणवत्तेची जाणीव निर्माण करत अनेक यशस्वी विद्यार्थी घडवले असून, जान्हवीच्या रूपाने त्या परंपरेत आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला गेला आहे.

 

जान्हवीच्या यशानिमित्त आयोजित गौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार राजेश मोरे, नगरसेवक हर्षल राजेश मोरे, सुरज राजन मराठे, नगरसेविका सौ. दिपाली पाटील, श्री. संतोष चव्हाण, श्री. गजानन व्यापारी, श्री. अमोल भोगले तसेच श्री. स्वप्निल पंढरीशेठ पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी जान्हवीचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

डोंबिवलीच्या शैक्षणिक परंपरेला नवा मानाचा तुरा खोवणाऱ्या जान्हवी कुलकर्णीचे यश हे केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मेहनत, जिद्द आणि सातत्य यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणून जान्हवीकडे पाहिले जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें