गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध

आबलोली (संदेश कदम)

निसर्गरम्य परिसर, नारळ पोफळी आणि इतर फळ झाडें, आंब्याची बाग आणि ह्या ठिकाणी कॉलेजमधील केलेली मस्ती, एकत्र केलेला अभ्यास, एकत्र केलेला प्रवास, त्यातल्या गमती जमती, शिक्षकांनी केलेल्या शिक्षा, मित्रांमुळे खाल्लेला मार अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पागोष्टी करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि निमित्त होतं श्री. देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज गुहागर या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दिनांक १० मे २०२६ रोजी रामपूर येथे उत्साह आणि जल्लोषात संपन्न झाला

 

१९८९ ते १९९० साली अकरावी – बारावी कॉमर्स मध्ये शिक्षण घेतल्यानंतर जवळपास ३६ वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन स्नेहसंमेलन करण्याचा पुनर्योग १० मे २०२६ रोजी नेचर रिसॉर्ट रामपूर, येथे पार पडला.

 

दोन महिने उन्हाचा कडाका आणि अकस्मात होत असलेला पाऊस आणि येणाऱ्यांची कमी संख्या यामुळे हे ह्यावर्षीच्या स्नेहसंमेलना साठी किती जण येतील होईल याची भीती होती. परंतु जुन्या मित्र-मैत्रिणींना पुन्हा भेटण्याच्या आतुरतेने सर्वजण मुंबई, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून भर उन्हात उपस्थित राहिले

 

सकाळी ०९:०० वाजता नेचर रिसॉर्ट येथे सर्वजण जमण्यास सुरुवात झाली. सकाळच्या अल्पोपहार नंतर सर्व मित्र मैत्रिणीना एकमेकांना गुलाबाचे आणि बागेतील फुल देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. राजेश विंचू यांनी केली आणि आपल्या ग्रुपचे नामकरण मैत्री कट्टा असे सुचविले. आपल्या वर्गातील सध्या हयात नसलेल्या मित्र-मैत्रिणींना श्रद्धांजली अर्पण करून

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश कोळवणकर यांनी केले. रामपूर येथील डॉ. रावराणे यांच्या नेचर रिसॉर्ट चे नियोजन श्री राजेश विंचू आणि संतोष शिंदे यांनी केले.

 

स्नेहसंमेलन यशस्वीपणे आयोजित केलेले श्री राजेश विंचू यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून नेचर रिसॉर्ट चे सर्वेसर्वा डॉ मनोज रावराणे यांनी दोस्ती वरील मन भारावून टाकणार गाणं सादर केले.

 

त्यानंतर सर्वांनी आपण सध्या करत असलेले कार्यक्षेत्र, जीवनामध्ये प्राप्त केलेले यश, आपली माहिती आणि आपल्या कुटुंबाची माहिती देऊन आपला परिचय दिला. यशस्वी उद्योजक श्री. सचिन बाईत यांनी मार्गदर्शनपर सल्ले दिले. हौशी विद्यार्थ्यांनी गाणी आणि नृत्य सादर करून आपल्यातील कलागुणांची सादरीकरण केले.

 

सर्व सादरीकरणानंतर आपला हा ग्रुप वृद्धिंगत कसा होईल आणि

पुढील स्नेहसंमेलनासाठी जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणी कशा येतील याचे नियोजन करायला सांगितले

 

जेवणानंतर पुन्हा एक ओपन फोरम चर्चा करून नविन मित्र मैत्रिणींच्या सुप्त गुणांना वाव देवून डान्स मस्ती करून, भविष्य सांगून सांगता करण्यात आली

यावेळी अजित अहिरराव, सचिन बाईत, विनायक झगडे, राजेश कोळवणकर, राजेश विंचू, पिरोज आरेकर,संतोष बारगोडे, वैभव गुहागरकर, मिलिंद गुरव,संतोष शिंदे, उत्तम कोलगे, राजेश भोसले, अनिल घाणेकर, अनिता आरेकर – बोरकर,विष्णू सांगळे, राजेश व्ही. भोसले, निशा ओक, साधना गोयथळे, गीता नागेश उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें