गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम)

माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त स्वर्गीय बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, माधवबाग चिपळूण आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत महाआरोग्य शिबिर नुकतेच गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाले

यावेळी गुहागर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री. भास्करशेठ जाधव , आमदारांचे स्वीय सहाय्यक संतोष तांदळे, वेळणेश्वर गटाच्या विभागप्रमुख सौ. सिद्धीताई रामगडे, डॉ. सौरभ सुर्वे आणि टीम, कुटगिरी गावचे पोलीस पाटील सुधाकर खेतले, तंटामुक्ती अध्यक्ष आयु. विजय कदम, चिपळूण रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष दिलिप खेतले,सैनिक हेमंत खेतले, गोर गरिबांचे कैवारी भाई सपकाळ ,पाभरे गावचे समाजसेवक काशिराम पाष्टे, विजय घडशी, प्रतिष्ठानचे जेष्ठ सल्लागार दत्ताराम डिंगणकर, अर्जुन आगरे, पीएसआय प्रकाश खेतले , पाभरे गावचे समाजसेवक अशोक बागकर, तंटामुक्ती अध्यक्षा सौ. जोस्त्ना कातळकर,कुटगिरी गावचे अध्यक्ष मनोहरजी खेतले, गावठण तरुण विकास मंडळ वाडी अध्यक्ष मंगेश खेतले, शंभर मारुती खेतले,विनय कातळकर, सिताराम खेतले, माजी उपसरपंच सुरेश खेतले, विठोबा नाना खेतले, ह.भ.प.सुभाष महाराज जाधव, कुटगिरी गावचे शाखा प्रमुख अरविंद खेतले, चारुदत्त सावंत, संतोष खाकम, चंद्रकांत खाकम, महादेव खाकम, काशिराम डिंगणकर आदी. मान्यवर उपस्थित होते . या शिबिरामध्ये वैद्यकीय तपासणी, नाडी परीक्षण, आहार व व्यायाम विषयक सल्ला, रँडम ब्लड शुगर, SPO2, बॉडी मास इंडेक्स (BMI), निशुल्क ECG तपासणी, फुफुसाची कार्यक्षमता तपासणी इ. तपासण्या करण्यात आल्या. १५० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्या सर्व सहभागी ग्रामस्थांचे,माता – भगिनींचे आभार मानण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप तुकाराम खेतले यांना महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड २०२६ जाहीर झाल्यामुळे आमदार भास्करशेठ जाधव यांनी त्याचा जाहीर सत्कार केला. त्यानंतर डॉ. यतीन जाधव यांनी खूप मोलाचे सहकार्य केले. त्यांचाही गौरव करण्यात आला.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप खेतले, अमोल खेतले,सुरज हुमणे, ओम वीर, मंदार हुमणे, शिशिर खेतले, गणेश जाधव, रोहित सावंत,लक्ष खाकम, दुर्वेश खाकम, कुणाल खाकम खुप मेहनत घेतली. शेवटी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप खेतले यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें