बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; वडील आणि भावाला पोलिसांनी घेतले ताब्यात

बातमी :

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात उघडकीस आलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. राजुरा शिवारात काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा अर्धवट जळालेला आणि शीर धडावेगळे केलेला मृतदेह आढळून आला होता. या अमानुष घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

प्राथमिक तपासात मृत महिलेची ओळख पटविणेही पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखा, फॉरेन्सिक पथक आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने पुढे नेत अखेर धक्कादायक सत्य उघड केले.

 

मृत तरुणीचे नाव शिवानी असल्याचे समोर आले असून, तिचे तिच्या चुलत भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून स्वतःच्या पित्यानेच तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात शिवानीच्या भावानेही पित्याला साथ दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी आधी शिवानीची हत्या केली आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे शीर धडापासून वेगळे करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह पूर्णपणे जळून न गेल्याने हा प्रकार उघडकीस आला.

या क्रूर घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली असून, नातेसंबंधांवर संशय घेत स्वतःच्या मुलीचाच जीव घेणाऱ्या पित्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें