पडवे ग्रामपंचायत इमारतीचा उद्घाटन सोहळा २४ मे रोजी होणार संपन्न

पडवे ग्रामपंचायत इमारतीचा उद्घाटन सोहळा २४ मे रोजी होणार संपन्न

पालक मंत्री  ना.डॉ.उदय जी सामंत यांच्या हस्ते उद्घाटन; विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती

गुहागर :
निर्मल ग्रामपंचायत पडवे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथील  जन सुविधा योजने अंतर्गत आणि ग्रामपंचायत निधी मधून बांधण्यात आलेल्या नवीन ग्रामपंचायत इमारतीचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक २४ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता ग्रामपंचायत कार्यालय, पडवे येथे आयोजित करण्यात आला आहे.

या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. उदयजी सामंत यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, गुहागर विधानसभा आमदार भास्करराव जाधव, माजी आमदार विनय नातू, पंचायत समिती सभापती प्रणवजी पोळेकर उपसभापती निलेशजी सुर्वे, कृषी व पशुसंवर्धन सभापती महेशजी नाटेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तसेच तहसीलदार परिक्षित पाटील, पोलिस निरीक्षक सचीन सावंत, , शाखा अभियंता आर. के. ढगे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन सरपंच मुजीब जांभारकर, उपसरपंच  श्रीमती मानसी सुर्वे तसेच ग्रामपंचायत अधिकारी हरीश कुळे यांनी केले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें