IAS ऑफिसर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार – कु. समृद्धी सुरेश आंबेकर

IAS ऑफिसर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार – कु. समृद्धी सुरेश आंबेकर

गुहागर तालुक्यात दहावी परीक्षेत प्रथम; ९९.२०% गुण मिळवत घवघवीत यश

आबलोली (संदेश कदम) :

आई-वडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची जिद्द यांच्या जोरावर IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे मत गुहागर तालुक्यातील वाघांबे गावची सुकन्या तथा पाटपन्हाळे हायस्कूलची विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने व्यक्त केले आहे.

 

नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालात कु. समृद्धी आंबेकर हिने तब्बल ९९.२० टक्के गुण मिळवत गुहागर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 

समृद्धीशी संवाद साधताना तिने सांगितले की, “आज मिळालेल्या यशामागे माझे आई-वडील आणि शिक्षक यांचे मोठे योगदान आहे. दहावी म्हटले की विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण होते. मात्र माझ्या पालकांनी आणि शिक्षकांनी माझा आत्मविश्वास वाढवला. त्यामुळे अभ्यासाकडे सकारात्मक दृष्टीने पाहता आले.”

 

ती पुढे म्हणाली की, “मी कोणताही वेगळा ताण न घेता नियमित वेळापत्रकानुसार अभ्यास केला. सकाळी वाचन आणि संध्याकाळपासून रात्रीपर्यंत लिखाणावर भर दिला. परीक्षा जवळ आल्यानंतर गणित आणि विज्ञान विषयांवर विशेष लक्ष केंद्रित केले. तर भाषा आणि इतिहास विषयांचाही सातत्याने अभ्यास सुरू ठेवला.”

 

समृद्धीने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर विविध स्पर्धा परीक्षा, निबंध स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन आणि वक्तृत्व स्पर्धांमध्येही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. याबाबत बोलताना ती म्हणाली की, “इयत्ता पाचवीपासून मी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत गेले. सुरुवातीला भीती वाटायची, पण नंतर आत्मविश्वास वाढत गेला. शिक्षकांचे प्रोत्साहन आणि सातत्यपूर्ण सरावामुळे स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची उत्सुकता निर्माण झाली.”

 

दहावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संदेश देताना समृद्धी म्हणाली की, “दहावीची परीक्षा आहे म्हणून घाबरून जाऊ नका. वेळेचे योग्य नियोजन करा, नियमित अभ्यास करा आणि शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनाखाली आत्मविश्वासाने तयारी करा. प्रामाणिक मेहनत घेतली तर यश निश्चित मिळते.”

 

समृद्धी आंबेकरच्या या उज्ज्वल यशामुळे पाटपन्हाळे हायस्कूलसह संपूर्ण गुहागर तालुक्याचा गौरव वाढला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें