कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत आठवडे बाजारही बंद; वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई सुरूच

पनवेल महानगरपालिकाच्या प्रभाग समिती ‘क’ कामोठे अंतर्गत अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या आणि अतिक्रमणांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाने विविध भागांमध्ये धडक कारवाई केली.

कामोठे विभागातील मानसरोवर रोड, खांदेश्वर रेल्वे स्टेशन रोड, गणपती मंदिर परिसर, सेक्टर १८ मधील नीलकंठ स्वीट परिसर, ॲक्सिस बँक समोरील परिसर, मोठा खांदा हायवे लगतचा सेक्टर २२ तसेच कजरी समोरील फुटपाथ परिसरात ही कारवाई करण्यात आली. सदर मोहिमेवेळी सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी डॉ. रुपाली माने उपस्थित होत्या.

 

कारवाईदरम्यान सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांच्या हातगाड्या, टेम्पो आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. नीलकंठ चौक परिसरातून आईस्क्रीम व केएफसीची हातगाडी जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेली वाहने आणि साहित्य सुवर्णदुर्ग कार्यालय, कामोठे येथे जमा करण्यात आले.

 

अतिक्रमण विभागाच्या कारवाईमध्ये एकूण १८ सिलेंडर, १८ हातगाड्या, १५ आईस्क्रीम गाड्या, १ जाहिरात टेम्पो, २ शिलाई मशीन, १७ खुर्च्या, ३ टेबल, १ वजन काटा, २ तवे, १ चायनीज काउंटर तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच अनधिकृतरीत्या आंबे विक्री करणाऱ्या व्यावसायिकांविरोधातही कारवाई करून त्यांच्या गाड्या आणि आंब्याच्या पाट्या जप्त करण्यात आल्या.

 

सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि वाहतूक व्यवस्थेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत व्यवसायांवर आगामी काळातही नियमितपणे कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे अधिक्षक दशरथ भंडारी यांनी दिली.

दरम्यान, प्रभाग समिती ‘क’ कामोठे अंतर्गत सोमवार, बुधवार आणि गुरुवारी भरविण्यात येणाऱ्या आठवडे बाजारांवरही अतिक्रमण विभागाने तोडक कारवाई करून हे बाजार बंद करण्यात आले आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें