विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, जागावाटपाची घोषणा

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, जागावाटपाची घोषणा

 

काँग्रेस 8, शिवसेना (उबाठा) 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 3 जागांवर लढणार; उर्वरित 2 जागांबाबत लवकरच निर्णय

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील 17 जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने (मविआ) 17 पैकी 15 जागांवर एकमत साधले असून उर्वरित दोन जागांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

 

विधान परिषदेच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी जागावाटपाचा तपशील जाहीर केला.

 

महाविकास आघाडीच्या सूत्रांनुसार काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड या आठ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुणे, ठाणे आणि सांगली-सातारा या तीन जागांवर उमेदवार देणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष रायगड, जळगाव, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या चार जागांवर निवडणूक लढवणार आहे.

 

या बैठकीला सुप्रिया सुळे, अनिल देसाई, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, अदिती नलावडे आणि माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे यांच्यासह विविध नेते उपस्थित होते.

 

यावेळी सत्ताधारी महायुतीवर टीका करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर होत असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षांचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू असून काही ठिकाणी लाखो रुपयांचे आमिष दाखवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीचे घोडेबाजारात रूपांतर केल्याचा आरोप करत महाविकास आघाडी भाजप-महायुतीच्या दंडेलशाहीविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स : विधान परिषद निवडणूक 2026, महाविकास आघाडी, हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे, महाराष्ट्र राजकारण, MVA Seat Sharing, Maharashtra Legislative Council Election 2026.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]