बारसु अणुऊर्जा विरोधात पर्यावरण पूरक औद्योगिक विकास संघटना स्थापन

■ *बारसु अणुऊर्जा विरोधात पर्यावरण पूरक औद्योगिक विकास संघटना स्थापन*

■ *काही दिवसांपूर्वी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषीत केली होती अणुऊर्जा*

■ *संघटनेच्या समन्वयक पदी दीपक नागले,तर अध्यक्ष पदी प्रसाद गुरव*

समिर शिरवडकर-रत्नागिरी.

राजापूर :- तालुक्यातील बारसू,गोवळ, सोलगाव, शिवणे,नाटे,धौलवल्ली या भागात काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकार आणि अदानी पॉवर लिमिटेड यांच्या मध्ये अणुऊर्जा साठी करार करण्यात आला आहे. यात ६००० मेगावॅट तर गुंतवणूक १.५०००० कोटी, आणि प्रत्येक्ष अप्रत्येक्ष रोजगार १२०० इतकी आहे.याच बरोबर रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड,आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड सुद्धा अणुऊर्जा प्रकल्प प्रस्थावित आहे.

बारसू मधील प्रस्थावित अणुऊर्जा ला रोखण्यासाठी आणि पर्यावरण पूरक प्रकल्प आणण्यासाठी राजापूर मधील वरील विभागातील तरुणांनी एकत्र येऊन निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्या अश्या विनाशकारी प्रकल्पाला रोखण्यासाठी *पर्यावरण पूरक औद्योगिक विकास संघटना राजापूर* या नावाने पर्यावरण पुरक अशी संघटना स्थापन केली आहे. यात १९ पदाधिकारी असून, समन्वयक पदी दीपक नागले तर अध्यक्ष पदी प्रसाद गुरव, सचीव संजय नाटेकर,उपाध्यक्ष विनोद,गणेश पाष्ठे, खजिनदार संतोष गुरव, सहखजिनदार पुरुषोत्तम खांबल,सदस्य अनुक्रमे श्रीकांत सोडये,उमेश शिवगण, दीपक बाणे, प्रश्नात गुरव, राजाराम गुरव, अमोल सोगम,प्राज्योत खडपे, नितीन जाधव, मनोज बाणे, योगेश चव्हाण, विनोद गुरव, आणि किरण गुरव अश्या प्रकारे समिती स्थापन करुन विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्प ला रोखण्यासाठी सज्ज झाली आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें