दिव्यांगजनांसाठी अभिनव प्रकल्पांचे सादरीकरण; ‘सॉल्व्हथॉन २०२५-२६’च्या अंतिम निवड प्रक्रियेला प्रारंभ

highlits

दिव्यांगजनांसाठी अभिनव प्रकल्पांचे सादरीकरण; ‘सॉल्व्हथॉन २०२५-२६’च्या अंतिम निवड प्रक्रियेला प्रारंभ

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): यशवंतराव चव्हाण सेंटर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ‘सॉल्व्हथॉन २०२५-२६ : इनोव्हेट फॉर दिव्यांगजन’ या स्पर्धेच्या अंतिम निवड प्रक्रियेला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.

या प्रसंगी मा. यशवंत शितोळे, मा. कविता मुरुगकर, मा. केतन कोठारी, मा. पारुल कुमठा तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी स्पर्धकांना शुभेच्छा देताना दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संशोधन आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त कल्पनांची आवश्यकता अधोरेखित केली.

अंतिम फेरीत विविध संघांनी दिव्यांग व्यक्तींच्या दैनंदिन जीवनातील अडचणींवर प्रभावी उपाय सुचविणारे अभिनव प्रकल्प सादर केले. यामध्ये मानव गट, पुणे यांचा ‘ब्लाइंड तिकीट सिस्टिम’, व्हिजनर्स गट, नाशिक यांची ‘स्मार्ट ब्लाइंड स्टिक’, प्रयास गट, पालघर यांचे दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार उपलब्धता व संधी निर्माण करणारे व्यासपीठ, वी कॅन गट, आंध्रप्रदेश यांचे स्वसंरक्षणासाठीचे डिव्हाइस, फार्मासिस्ट गट, नाशिक यांचे औषध सेवनासाठी स्मरणयंत्र, त्रिनेत्रा गट, पुणे यांचे नाडी तपासणी यंत्र तसेच जीओएम गट, नाशिक यांचे ‘क्यूआरएक्स इन्फो’ हेल्थकेअर ॲप यांचा समावेश होता.

सादर करण्यात आलेल्या या अभिनव संकल्पनांमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. सर्व सहभागी संघांनी आपल्या प्रकल्पांचे प्रभावी सादरीकरण केले. अशा उपक्रमांमुळे दिव्यांगजनांसाठी अधिक समावेशक, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित समाजनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर विभागाचे संयोजक मा. विजय कान्हेकर, विभाग प्रमुख दिपीका शेरखाने, समन्वयक मनिषा खिल्लारे तसेच राहील शेख, सूत्रसंचालक हेजल न्यायनीत, समृद्धी पुजारी, शिवम जाधव आणि संकेत जांभळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या अंतिम निवड प्रक्रियेनंतर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या तीन संघांची घोषणा करण्यात आली आहे. विजेत्या संघांचा गौरव करण्यासाठी स्वतंत्र पुरस्कार वितरण सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. विजेत्या तिन्ही संघांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

या स्पर्धेत सादर करण्यात आलेल्या संकल्पना दिव्यांगजनांच्या गरजांवर आधारित असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यावर उपाय सुचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी उपयुक्त आणि सुलभ उपाययोजना विकसित करण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांना महत्त्व प्राप्त होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें