शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🌏 शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

वनविभागाची तातडीची कारवाई; अज्ञात शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू

संगमेश्वर- वार्ताहर 

संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हारेकरवाडी परिसरात शिकाऱ्यांनी लावलेल्या बेकायदा फासकीत अडकून एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वन्यजीव प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

तुरळ-माखजन मार्गालगत खैराच्या झाडाला लोखंडी तारांची फासकी लावण्यात आली होती. या मार्गावरून जात असताना बिबट्याचा पाय फासकीत अडकला. स्वतःची सुटका करण्यासाठी त्याने आटोकाट प्रयत्न केले, मात्र झाडालाच लोंबकळत राहिल्याने त्याचा श्वास गुदमरून जागीच मृत्यू झाला.

 

शनिवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास स्थानिक पोलीस पाटलांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी लोखंडी तार कापून आणि झाडाचा खुंट तोडून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. मृत बिबट्याचे सर्व अवयव सुरक्षित अवस्थेत आढळून आल्याने शिकाऱ्यांना त्याची तस्करी करता आली नसल्याचे स्पष्ट झाले.

 

त्यानंतर कडवईच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांमार्फत शवविच्छेदन करण्यात आले. वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी होऊ नये म्हणून सर्व अवयवांसह मृतदेहावर जागेवरच अग्नीसंस्कार करण्यात आले.

 

या प्रकरणी वनपाल सागर गोसावी यांनी वन गुन्हे अन्वेषण रजिस्टरनुसार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

 

कारवाईदरम्यान परिक्षेत्र वनाधिकारी विक्रम गुरव, परिमंडळ वनाधिकारी सागर गोसावी, वनरक्षक सुप्रिया काळे, सुरज तेली, सहयोग कराडे तसेच पंच उपस्थित होते. विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

 

वनविभागाने वन्यजीव शिकारीच्या घटनांविरोधात कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारचे बेकायदा सापळे लावणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. नागरिकांनी परिसरात संशयास्पद हालचाली अथवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ९०९६५७८७६१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 


SEO Keywords: संगमेश्वर बिबट्या मृत्यू, तुरळ बिबट्या शिकार, Ratnagiri Leopard Death, Leopard Trap Sangameshwar, Ratnagiri Forest Department, Wildlife Crime Maharashtra, Konkan News, Sangameshwar News.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]