स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकंठ हरपला; वयाच्या ८९व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : भारतीय संगीतविश्वातील मधुर आणि सोज्वळ आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका Suman Kalyanpur यांचे रविवारी, ३१ मे २०२६ रोजी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी संगीतसृष्टीत शोककळा पसरली आहे.

Suman Kalyanpur यांनी आपल्या कारकिर्दीत मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, उडिया, पंजाबी, भोजपुरी, राजस्थानी आणि कानडीसह अनेक भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी गायली. भावगीत, भक्तीगीत, गझल आणि चित्रपट गीतांच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.

भवानीपूर येथे जन्म; संगीताचे संस्कार घरातूनच

२८ जानेवारी १९३७ रोजी अविभाजित भारतातील भवानीपूर (आताचा बांग्लादेश) येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे माहेरचे नाव सुमन हेमाडी असे होते. विवाहानंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. वडील शंकरराव हेमाडी आणि आई सिताबाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. शास्त्रीय संगीताचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता.

कोई पुकारे धीरेसे’पासून सुरू झाला सुवर्ण प्रवास

रुपेरी पडद्यावरील त्यांचे पहिले गाणे ‘कोई पुकारे धीरेसे तुझे आँख के तारे’ हे होते. या गाण्यामुळे त्यांचा मधुर आवाज घराघरात पोहोचला. त्यानंतर त्यांनी अनेक अजरामर गाणी रसिकांना दिली.

त्यांनी गायलेल्या ‘मन मोहन मन मे हो तुम्ही’ या गीताला प्रतिष्ठेचा ‘तानसेन पुरस्कार’ मिळाला होता. त्यांच्या गायकीत शास्त्रीय संगीताची मजबूत बैठक आणि भावपूर्ण सादरीकरणाची खास छाप होती.

गाजलेली लोकप्रिय गाणी

चित्रपट गीतांमध्ये ठसा

जिथे सागरा धरणी मिळते

घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात

माहेरी जा सुवासाची कर बरसात

निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई

कशी गवळण राधा बावरली

नाविका रे वारा वाहे रे

केतकीच्या बनी तेथे नाजला ग मोर

उठा उठा चिऊताई

या लाडक्या मुलांनो

भावगीते आणि भक्तीगीतांची अमिट छाप

अक्रुरा नको नेऊ माधवा

आकाश पांघरुनी

केशवा माधवा

जुळल्या सुरेल तारा

जेथे जातो तेथे

नकळत सारे घडले

वाट इथे स्वप्नातील

शब्द शब्द जपून ठेव

संगीतविश्वातील अजरामर स्वर हरपला

Suman Kalyanpur यांच्या निधनाने भारतीय संगीतसृष्टीने एक सोज्वळ, मधुर आणि भावपूर्ण स्वर गमावला आहे. जुन्या पिढीपासून ते नव्या पिढीपर्यंत त्यांच्या गाण्यांची मोहिनी कायम असून, त्यांच्या सुरेल आठवणी रसिकांच्या मनात सदैव जिवंत राहणार आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें