स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

विक्रांतदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांना झाडे वाटप; पुढील वर्षी झाडांची पाहणी करण्याचे आवाहन

आबलोली (सुजित सुर्वे, पडवे ) हिंदू हृदयसम्राट व शिवसेना प्रमुख स्वर्गीय मा. श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद रत्नागिरीचे माजी अध्यक्ष मा. श्री विक्रांतदादा भास्करशेठ जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ग्रामस्थांना विविध प्रकारची झाडे वाटप करण्यात आली. यावेळी विभागप्रमुख श्री रविंद्र आंबेकर यांनी ग्रामस्थांना दिलेली झाडे जपून वाढविण्याचे आवाहन केले. तसेच पुढील वर्षी पुन्हा एकत्र येऊन किती झाडे जगवली गेली याची पाहणी करण्याचा संकल्प करण्यात आला.

या कार्यक्रमाला विभागप्रमुख श्री रविंद्र आंबेकर, बूथ प्रमुख श्री तुकाराम हुमणे, महिला आघाडीच्या श्रीमती रेखा हुमणे, श्री गणेश हुमणे, श्री शिवराम हुमणे, श्री विनोद यादव आणि श्री वसंत अवेरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृक्षारोपणासारख्या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण होत असून अशा सामाजिक उपक्रमांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]