गुहागर केंद्रस्तरीय मुख्याध्यापकांची शाळा प्रवेशोत्सव नियोजन सभा उत्साहात संपन्न

गुहागर केंद्रस्तरीय मुख्याध्यापकांची शाळा प्रवेशोत्सव नियोजन सभा उत्साहात संपन्न

 

नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील यांचे आवाहन

 

गुहागर, (प्रतिनिधीसुजित सुर्वे):

गुहागर केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांची शाळा प्रवेशोत्सव नियोजन सभा केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र शाळा गुहागर क्रमांक २ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. आगामी शाळा प्रवेशोत्सव प्रभावी व नियोजनबद्ध पद्धतीने साजरा करण्याबाबत या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

यावेळी नगरसेविका सौ. साक्षी तेलगडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गणेश तेलगडे, गुहागर क्रमांक १ चे अपग्रेड मुख्याध्यापक ईश्वर वासावे, उपक्रमशील शिक्षक अमोल धुमाळ, संजय आवटे, गुहागर हायस्कूलचे अमोल कतकर, अन्नपूर्णा विद्यालयाच्या सौ. बेंडल, सौ. आवटे, आरे-देवरहाटीचे गावित सर, गुहागर क्रमांक २ चे जुनेद शेख, असगोली क्रमांक १ चे प्रदीप पवार, मुद्दमवार मॅडम, दीक्षा गुरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

सभेदरम्यान विभागीय परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल जुनेद शेख सर यांचा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश तेलगडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

यावेळी ईश्वर वासावे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील यांनी शाळा प्रवेशोत्सव हा मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत नियोजनबद्ध आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले.

 

पहिलीत प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे विविध रंगांमध्ये कागदावर उमटविणे, त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणे, मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण करणे अशा आकर्षक उपक्रमांच्या माध्यमातून शाळा प्रवेशोत्सव संस्मरणीय करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

सभेच्या शेवटी सर्व शाळांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल धुमाळ सर यांनी केले.


टॅग्स : गुहागर बातम्या, शाळा प्रवेशोत्सव 2026, गुहागर शिक्षण विभाग, डॉ मनोज पाटील, गुहागर केंद्र शाळा, रत्नागिरी शिक्षण बातम्या, शाळा नियोजन सभा.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें