उपमुख्याध्यापिका मनीषा सावंत मॅडम व पर्यवेक्षिका गायत्री कनगुटकर मॅडम यांचा सन्मान

उपमुख्याध्यापिका मनीषा सावंत मॅडम व पर्यवेक्षिका गायत्री कनगुटकर मॅडम यांचा सन्मान

गुहागर एज्युकेशन सोसायटी संचालित श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरच्या कार्यतत्पर शिक्षिका मनीषा सावंत मॅडम यांची उपमुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल व प्रशालेच्या पर्यवेक्षक पदावर कनगुटकर मॅडम यांची पर्यवेक्षक पदावर निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .मनीषा सावंत मॅडम व गायत्री कनगुटकर मॅडम ह्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रांमध्ये कार्य तत्परतेने व कर्तव्यदक्षपणे नियमितपणे अध्यापन कार्य करीत असून त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत. सदर कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रभुनाथ देवळेकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता कांबळे मॅडम उपस्थित होत्या .त्यावेळी बोलताना महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे संचालक मनोज पाटील म्हणाले की प्रशालेच्या उपमुख्याध्यापक पदी मनीषा सावंत मॅडम यांची निवड झाल्याबद्दल व प्रशालेच्या पर्यवेक्षिका पदी गायत्री कनगुटकर मॅडम यांची निवड झाल्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान वाटतो .त्यांच्या यापुढील शैक्षणिक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें