नवतरुण विकास मंडळ काताळे, गोंधळकर वाडी मौजे – काताळे यांच्या वतीने आदर्श शाळा काताळे नंबर १ शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नवतरुण विकास मंडळ काताळे, गोंधळकर वाडी मौजे – काताळे यांच्या वतीने आदर्श शाळा काताळे नंबर १ शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

गुहागर – सचिन कुळये, तवसाळ 

 

शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी नवतरुण विकास मंडळाने आपली रत्नागिरी ग्रुप तर्फे जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा काताळे 1 आणि जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा तवसाळ बाबर वाडी या मुलांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम करण्यात आला. सदर कार्यक्रमाला काताळे गावातील मुले अंगणवाडी ते इयत्ता सातवी आणि बाबर वाडीतील इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी पर्यंत च्या मुलांना साहित्य वाटप करण्यात आले.

एकूण 54 मुले उपस्थित होती त्यांना शालेय बॅग, छत्री, वहि,पेन, पेन्सिल,कंपास, पाटी,आणि खाऊ इत्यादी उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले आणि शाळेला पंखा, पृथ्वी, काही नकाशे, काही लागणारे बोर्ड देण्यात आले, साहित्य वाटप करताना आपल्या गावातील तेली वाडी, बौद्ध वाडी, कदम वाडी, उगवतली वाडी, गोंधळघर वाडी, फौजदार वाडी बाबूगावकर वाडी, मावळत वाडी, वरची वाडी, कोंड वाडी,आणि बाबर वाडी इत्यादी सर्व ग्रामस्थ आणि महिला वर्ग यांची आवर्जून उपस्थिती लाभली.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे म्हणुन मा.श्री. उतेकर साहेब. श्री. चव्हाण साहेब श्री. गराटे साहेब. आणि सभासद यांचे मंडळाच्यावतीने स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि महत्वपूर्ण माहिती श्री. करंबळे गुरुजी,श्री. चव्हाण गुरुजी, श्री.कांबळे गुरुजी यांनी मोलाचे सहकार्य करून पाहुण्यांना आपल्या शाळेची माहिती दिली. त्याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन श्री अनिल रसाळ साहेब हे खास कार्यक्रमासाठी मुंबईतून आले आणि शाळेची माहिती दिली त्याच बरोबर अंगणवाडी सेविका रसाळ मॅडम बाबर वाडी शालेय कमिटी अध्यक्षा सौ. दिशा येद्रे मॅडम काताळे शालेय कमिटी अध्यक्षा सौ. मयुरी बारस्कर मॅडम आणि ग्रामस्थ यांचे शाब्दिक स्वागत गुरुजी यांनी केले आपल्या गावातील ग्रामस्थांनी शाळेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवून पाहुण्यांची मने जिंकली.

 

कार्यक्रम यशस्वी आणि दिमाखदार होण्यासाठी श्री. विलास बारस्कर यांनी मोफत साउंड सिस्टीम उपलब्ध करून दिली त्यांचे मंडळाच्या वतीने जाहिर आभार, त्याच प्रमाणे प्रमुख उपस्थितांमध्ये श्री. संदीप जोशी साहेब , श्री. नरेश येद्रे,श्री.विजय पवार,श्री. श्रीधर रसाळ श्री. अनिल रसाळ,श्री. सचिन रसाळ,गिरीश कदम,श्री. संतोष बारस्कर, सदानंद बारस्कर, श्री सखाराम बारस्कर, विनायक बारस्कर, श्री. अशोक डिंगणकर,श्री. गोविंद बारस्कर, आदेश बारस्कर,श्री. सुधाकर दादा बारस्कर,श्री. भिकु बारस्कर, श्री. संतोष कुळये,श्री. शांताराम भुवड, आणि गावातील महिला वर्ग यांनी चांगली उपस्थिती दाखवली आमच्या नवतरुण विकास मंडळाचे आणि गावाचे नाव उज्वल केले त्या बद्दल आणि आपले ऋणी आहोत.

 

नवतरुण विकास मंडळ गोंधळघर वाडी आजपर्यंत कला,क्रिडा आणि शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अशी कामे करीत आली आहे, हे आपल्या सर्वांच्या सहकार्याने यापुढेही अशीच कामे आमच्या हातून घडू द्या.

आपल्या मायेचा आशीर्वाद मंडळाच्या कार्यकर्त्यांना, सभासदांना, महिला वर्ग यांना मिळो हीच अपेक्षा.

आपले आशिर्वाद आपली शाबासकी हीच आमच्यासाठी ऊर्जा. सर्वांचे पुनश्च आभार मानतो. जर कोणाचा नामोल्लेख राहिला असल्यास क्षमा असावी. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेत उपस्थितांचे आभार व्यक्त करत कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]