*NMMS परीक्षेत गुहागर हायस्कूलचे सुयश
गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर,सदानंद सुदाम पाटील विज्ञान,श्री. महेश जनार्दन भोसले वाणिज्य,
कै. विष्णुपंत पवार कला व कनिष्ठ महाविद्यालय, गुहागर
या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी NMMS (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. *सोहम समीर बावधनकर रत्नागिरी जिल्हा RANK (GEN11)*
वरद केदार भागवत रत्नागिरी जिल्हा RANK (EWS 4)
सर्व क्षेत्रातून या गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.या विद्यार्थ्यांनी मेहनतीने व चिकाटीने हे यश संपादन केले आहे.
भविष्यातही अशीच प्रगती करून शाळेचे व पालकांचे नाव उज्ज्वल करावे, अशी सदिच्छा व्यक्त करून त्यांचे मुख्याध्यापिका सौ सुजाता कांबळे मॅडम व उपमुख्याध्यापिका श्रीम.मनीषा सावंत मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
त्यावेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. कनगुटकर मॅडम, वरिष्ठ लिपिक रावणंग सर व संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होता. सर्वांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.














