श्री. गणेशराव महादेवराव कदम यांचे कडून जि.प. आदर्श शाळा वडेरु या शाळेला प्रिंटर भेट

श्री. गणेशराव महादेवराव कदम यांचे कडून जि.प. आदर्श शाळा वडेरु या शाळेला प्रिंटर भेट
आबलोली (संदेश कदम)
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वडेरू , तालुका चिपळूण या शाळेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी श्री. गणेशराव महादेवराव कदम यांनी शाळेला प्रिंटर भेट देऊन मौलिक सहकार्य केले. त्यांनी यापूर्वीही शाळेला मोठ्या प्रमाणात वस्तू रुपात देणगी देऊन सहकार्य केले आहे. या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. शैक्षणिक उठावातून प्रिंटर मिळवून देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर आत्माराम उकार्डे व सहशिक्षक श्री. रमेश भिकाजी लोंढे यांनी विशेष प्रयत्न केले.मुखाध्यापक सुधाकर उकार्डे यांनी श्री. गणेशराव महादेवराव कदम यांचे आभार मानून धन्यवाद दिले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें