जि.प.पू.प्रा.आदर्श शाळा कौंढर काळसूर गुरववाडी शाळेत “पाऊलवाट फाउंडेशन”मार्फत शालेय साहित्याचे वाटप ; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

जि.प.पू.प्रा.आदर्श शाळा कौंढर काळसूर गुरववाडी शाळेत “पाऊलवाट फाउंडेशन”मार्फत शालेय साहित्याचे वाटप ; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

गुहागर -सोमवार दिनांक 22 /06/ 2026 रोजी जि.प.पू.प्रा.आदर्श शाळा कौंढर काळसूर गुरववाडी येथे “पाऊलवाट फाउंडेशन” मुंबईच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

“पाऊलवाट फाउंडेशन” विविध सामाजिक उपक्रम राबवित असून त्यांपैकी एक उपक्रम म्हणजे “विद्यार्थी दत्तक पालक योजना” या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक साहित्याअभावी शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशाने विद्यार्थ्यांना वह्या,दप्तर, पेन, पेन्सिल यांसह इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला कौंढर काळसूर गावच्या सरपंच मा. सौ. सिया गुजर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री. रामदास गिजे, चिखली केंद्राचे केंद्रीय प्रमुख मा. श्री. प्रभाकर कांबळे सर पाऊलवाट फाउंडेशनचे संस्थापक,सचिव मा. डॉ. श्री कृपाल शिंदे,खजिनदार सौ. श्रुतिका शिंदे,श्री.दिलीप गोपाळराव शिंदे, सौ.दिपाली दिलीप शिंदे,शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक रामाणे सर,श्री.किरण सूर्यवंशी सर, श्रीम्.सुजाता यादव मॅडम, गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ श्री. भाई विचारे,श्री.श्यामसुंदर विचारे, श्री. दिलीप विचारे, सर्व शालेय समितांचे सदस्य, पालक विद्यार्थी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ. दिपाली शिंदे या कौंढर काळसूर गावच्या माहेरवासिनी असून या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांचे चिरंजीव डॉ. श्री. कृपाल शिंदे पाऊलवाट फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवित असल्याबद्दल मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. फाउंडेशनने केलेली मदत गुणवान विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देणारी ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिपक रामाणे सर यांनी फाउंडेशनचे व सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किरण सूर्यवंशी सर यांनी केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राहुल गांधींकडून उपोषण सोडवण्यासाठी प्रतिसादच मिळाला नाही; सोनम वांगचुक यांचा मोठा दावा २६ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांचा खुलासा; काँग्रेसकडून ट्रोलिंगचा आरोप, सरकारशी ‘मिडनाईट डील’ झाल्याचेही फेटाळले

राज्य

शहर चुनें