आदित्य ठाकरे सभागृहातून बाहेर पडताच एकनाथ शिंदेंची एन्ट्री; “कुठे गेले तुमचे मित्र?” म्हणत विधानसभेत रंगला सामना

आदित्य ठाकरे सभागृहातून बाहेर पडताच एकनाथ शिंदेंची एन्ट्री; “कुठे गेले तुमचे मित्र?” म्हणत विधानसभेत रंगला सामना

Eknath Shinde On Aditya Thackeray: पावसाळी अधिवेशनात आरोप-प्रत्यारोप; खात्यांच्या उत्तरावरून ठाकरे गट आक्रमक, शिंदेंचा पलटवार

मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागांबाबत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली.

लक्षवेधी प्रश्नांवर संबंधित मंत्री उत्तर देत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. “ज्या खात्यांसाठी एवढा आग्रह धरला, त्या खात्यांबाबत उत्तर देण्याची जबाबदारी घ्यायला हवी,” असा टोला त्यांनी लगावला.

एकनाथ शिंदे आपल्या अखत्यारीतील काही विभागांच्या प्रश्नांची उत्तरे इतर मंत्र्यांकडे सोपवत असल्याचा आरोप करत ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. “आमच्या सरकारमध्ये कोणत्याही मंत्र्यांनी जबाबदारीपासून पळ काढला नाही,” असेही त्यांनी म्हटले.

यावेळी अध्यक्षांच्या भूमिकेवरही आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला आणि काही वक्तव्ये रेकॉर्डमधून काढण्याची मागणी केली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधकांनी सभात्याग केला.

दरम्यान, आदित्य ठाकरे सभागृहाबाहेर गेल्यानंतर काही वेळातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत दाखल झाले. मंत्र्यांनी त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर शिंदे यांनी विरोधकांकडे पाहत विचारले, “कुठे गेले तुमचे मित्र? कुठे आहेत ते?”

“मी सभागृहात नव्हतो, मंत्र्यांनी मला माहिती दिली. काल जो झटका लागला, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे,” अशी टीका करत एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीचा हा वाद आता राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.

#MaharashtraAssembly #AdityaThackeray #EknathShinde #MaharashtraPolitics

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राहुल गांधींकडून उपोषण सोडवण्यासाठी प्रतिसादच मिळाला नाही; सोनम वांगचुक यांचा मोठा दावा २६ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांचा खुलासा; काँग्रेसकडून ट्रोलिंगचा आरोप, सरकारशी ‘मिडनाईट डील’ झाल्याचेही फेटाळले

राज्य

शहर चुनें