जैतापूर येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा उत्साहात शुभारंभ

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जैतापूर येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा उत्साहात शुभारंभ

 

0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्यास सुरुवात; घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवणार

 

जैतापूर, दि. 28 (वार्ताहर -प्रशांत पोवार) : प्राथमिक आरोग्य केंद्र, जैतापूर येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. ग्रुप ग्रामपंचायत दळेचे प्रशासक श्री. महेश करगुटकर आणि जैतापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. मीनल मांजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लहान बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

 

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. रूमडे यांनी पल्स पोलिओ मोहिमेबाबत सविस्तर माहिती देत, लसीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले. पोलिओमुक्त भारतासाठी एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, असे आवाहन त्यांनी पालकांना केले.

 

या कार्यक्रमास आरोग्य सहाय्यक श्री. नागवेकर, श्री. गावडे, श्री. मांजरेकर, श्री. साखरकर, श्री. पारकर, श्री. जाधव यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

या मोहिमेंतर्गत तालुक्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील बूथवर आज लसीकरण करण्यात आले असून, पुढील दिवसांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके घरोघरी जाऊन बालकांना पोलिओचे दोन थेंब देणार आहेत.

 

“दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय मिळवू दरवेळी” या घोषवाक्यासह पालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. पोलिओ लसीकरण पूर्णपणे सुरक्षित असून आपल्या बालकांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन डॉ. रूमडे यांनी केले.

 

दरम्यान, पालकांनीही मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या पाल्यांना पोलिओ डोस पाजून घेतला.

 

— रत्नागिरी वार्ताहर

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]