लोकराजा छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त कामोठ्यात अभिवादन कार्यक्रम संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लोकराजा छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त कामोठ्यात अभिवादन कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी (मंगेश जाधव )

लोकराजा, आरक्षणाचे जनक आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कामोठे शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सेक्टर-११ येथील नालंदा बुद्ध विहारच्या पाठीमागील पक्ष कार्यालयात नुकताच अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी वनिता साळवे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे आशा लवांडे, सुप्रिया कांबळे आणि सुनीता उके यांनी या अभिवादनास अनुमोदन दिले. तसेच अण्णासाहेब मगाडे यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 

सदर कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक दीपक दादा जाधव यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरक्षणविषयक ऐतिहासिक कार्याचा सविस्तर आढावा घेतला. सामाजिक न्यायाची पायाभरणी करताना शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी आनंद कसारे यांनी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांचे आभार मानले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]