जीवन शिक्षण गुहागर नं . १ शाळेत शिक्षण परिषद उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

*जीवन शिक्षण गुहागर नं . १ शाळेत शिक्षण परिषद उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

गुहागर

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक जीवन शिक्षण शाळा गुहागर नंबर एक येथे गुहागर केंद्राची शिक्षण परिषद केंद्रप्रमुख डॉ मनोज नरसी पाटील यांचे अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाली. त्यावेळी असगोली नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत झगडे सर, गुहागर नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर वसावे सर सेवा निवृत्त शिक्षक श्री सुधाकर कांबळे, गुहागर हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक श्री मोहिते सर, रूम टू रेड या प्रकल्पाचे तालुका समन्वयक रामटेके सर, गुहागर तालुका मूल्यवर्धन प्रशिक्षण समन्वयक विलास नरळकर, केंद्र मुख्याध्यापिका मनीषा शिंदे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री संजय आवटे सर, आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे शुभ हस्ते दीपप्रज्वलनाने शिक्षण परिषदेची सुरुवात झाली, गुहागर नंबर एक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी अत्यंत सुमधुर परिपाठ सादर केला .गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सुधाकर कांबळे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल व गुहागर नंबर दोन शाळेतील शिक्षक श्री जुनेद शेख सर यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गुहागर केंद्राच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मिशन अभय या विषयावर गुहागर नंबर एक शाळेचे पदवीधर शिक्षक श्री राजू सुर्वे सर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या अत्यंत कठोर कायद्याविषयी माहिती देताना १८ वर्षाखालील सर्व मुला मुलींचे लैंगिक शोषण ,अत्याचार आणि अश्लीलते पासून रक्षण करणे आणि दोषींना कडक शिक्षा देणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले .तसेच कायद्यातील तरतुदी ,विविध घटना, बालकांची सुरक्षितता, शिक्षकांकडून घ्यावयाची खबरदारी व शिक्षकांची कर्तव्य या विषयावर अत्यंत सखोल मार्गदर्शन केले. मूल्य संवर्धन तालुका समन्वयक श्री नरळकर सर यांनी जीवनामध्ये मूल्यांचे महत्त्व सांगितले. तसेच साप्ताहिक तासिका मध्ये दोन तासिका असून त्याबाबत राबवायचे उपक्रम विशद केले. रूम टू रीड करणार या योजनेचे तालुका समन्वयक रामटेके सर यांनी योजनेबाबत विस्तृत माहिती दिली .ग्रंथालय उपक्रमाबाबत गुहागर हायस्कूलच्या शिक्षिका बाणे मॅडम यांनी ग्रंथालयाचे महत्त्व ,रचना व कार्यवाही ,ग्रंथालयाचे नियोजन याविषयी अत्यंत ओघवत्या भाषेमध्ये मार्गदर्शन केले .ग्रंथ हेच गुरु असून जीवनामध्ये वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. सेतू अभ्यास याविषयी असगोली नंबर एक शाळेच्या शिक्षिका अंजली मुद्दामवार यांनी अतिशय सखोल मार्गदर्शन केले .राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा त्यांनी परामर्श घेतला .मित्र उपक्रम याविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना गुहागर नंबर दोन शाळेच्या शिक्षिका स्नेहा लोंढे मॅडम यांनी मित्र उपक्रम व त्याची कार्यवाही ,अध्ययन अध्यापनामध्ये मित्र उपक्रमाचा होणारा फायदा ,सहाध्यायी अध्ययन याविषयी माहिती दिली. चंद्रकांत झगडे सर यांनी शिक्षण परिषद अतिशय यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले .शासनाच्या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे त्यांनी आवाहन केले. गुहागर नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर वसावे सर यांनी सदर शिक्षण परिषदेचे अत्यंत यशस्वी असे आयोजन केले .शासकीय योजना बाबत ईश्वर वसावे सर यांनी मार्गदर्शन केले .केंद्रप्रमुख मनोज पाटील यांनी या केंद्र परिषदेमध्ये तज्ञ मार्गदर्शक यांनी विविध विषयावर सखोल मार्गदर्शन केल्याबद्दल साधन व्यक्ती यांचे व यशस्वी आयोजनाबद्दल गुहागर नंबर एक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांचे अभिनंदन केले .बालकल्याण योजना ,पाठ्यपुस्तक, गणवेश वाटप ,यु-डायस प्लस ,आधार अपडेशन, विद्यार्थी प्रमोशन, विविध शासकीय योजनांचा त्यांनी आढावा घेतला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ईश्वर हलगरे यांनी तर आभार प्रदर्शन राजू सुर्वे यांनी केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें