मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान आयोजित गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप सोहळा संपन्न 

मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान आयोजित गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप सोहळा संपन्न 

प्रतिनिधी (मंगेश जाधव)

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त, दिनांक २६ जून २०२६ रोजी मंडणगड-दापोली सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने मंडणगड येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू वाटपाचा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

 

या उपक्रमांतर्गत जिल्हा प्राथमिक शाळा आंबवणे खुर्द, न्यू इंग्लिश स्कूल तुळशी आणि श्रीपाद त्रैलोक्य पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय, उमरोळी या शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

 

या सामाजिक उपक्रमाचे तिन्ही शाळांनी मनापासून स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुकही व्यक्त करण्यात आले.

 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुमेध सकपाळ, सचिव उज्वल खैरे, सहसचिव तुषार नेवरेकर, माजी ग्रामीण अध्यक्ष अरविंद येलवे, ग्रामीण उपाध्यक्ष संकेत तांबे, सुमित खैरे, विधान पवार तसेच संस्थेचे इतर सदस्य उपस्थित होते.

 

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा हा स्तुत्य उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें