भारतीय बौद्ध महासभेचे पुरुष महिला संयुक्त कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न….

भारतीय बौद्ध महासभेचे पुरुष महिला संयुक्त कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न….

बातमीदार – राज पवार

दिनांक : ३० जून २०२६

मोबाईल: ८६०५९६२९७६

दि. बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा गुहागर यांच्या विद्यमाने ग्राम शाखा काजुर्ली मानवाडी येथील संबोधी बुद्ध विहारात पुरुष महिला संयुक्त कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर भारतीय बौद्ध महासभा गुहागर तालुका शाखा यांचे अध्यक्ष विद्याधर कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

पुरुष महिला संयुक्त कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार आणि दिप प्रज्वलन करून झाली. एन. बि.कदम यांनी त्रिसरणं पंचशिल व बुद्ध पूजापाठ घेतले. या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रवचनकार अनंत सावंत ( महाराष्ट्र राज्य सचिव, केंद्रीय शिक्षक, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष), एन. बि. कदम ( जिल्हा सरचिटणीस, केंद्रीय शिक्षक ),तालुका महिला अध्यक्ष मनिषा मोहिते, यांनी भारतीय बौद्ध महासभेची ध्येय आणि उद्दिष्ट आणि मिशन, शाखेचे काम कसे हिशोब कसे घ्यायचे, कार्यकर्त्यांची प्रबोधनाची आचारसंहिता, अश्या अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेची कार्य, विचार, प्रत्येक समाज बांधवांपर्यंत अनेक शिबिराच्या माध्यमातून कसे पोहचवता येईल याचे मार्गदर्शन आपल्या अध्यक्षीय मनोगतात कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्याधर कदम यांनी केले.

पुरुष महिला संयुक्त कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित कार्यक्रमात उपस्थित महिला अध्यक्ष महिला संघटक विशाखा कदम, कोषाध्यक्ष संजय मोहिते, संजय जाधव यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आम्रपाली मोहिते यांनी केले तर समीर जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें