तळवली हायस्कूलच्या 30 गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप; कोकण कट्टा व कै. शांताराम पाटील मेमोरियल ट्रस्टचा उपक्रम

SHARE:

तळवली हायस्कूलच्या 30 गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप; कोकण कट्टा व कै. शांताराम पाटील मेमोरियल ट्रस्टचा उपक्रम

 

वह्या, पाण्याच्या बाटल्या आणि डायरींचे वितरण; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सामाजिक संस्थांचा हातभार

 

तळवली | प्रतिनिधी (मंगेश जाधव)

 

गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तळवली येथे गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. कोकण कट्टा, मुंबई आणि कै. शांताराम पाटील मेमोरियल ट्रस्ट (रजि. E-19853) यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

 

कोकण कट्टा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे यांच्या पुढाकारातून ट्रस्टकडून मिळालेल्या 48 वह्या, 9 पाण्याच्या बाटल्या आणि 9 डायरी अशा शैक्षणिक साहित्याचे गुरुवार, 23 जुलै 2026 रोजी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

 

या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक एम. ए. थरकार, ज्येष्ठ शिक्षक साळुंके सर, देवरुखकर सर, सौ. नाईक मॅडम, बागल सर, गवळी सर, केळस्कर सर, कुळे सर, कोवाळे सर तसेच अन्य शिक्षकांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले.

 

या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच 30 विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कोकण कट्टाचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे आणि रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुमंत भिडे यांच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वी झाला.

 

यावेळी मुख्याध्यापक एम. ए. थरकार यांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या साहित्यामुळे त्यांच्या अभ्यासाला गती मिळेल आणि शैक्षणिक प्रगतीस निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. साहित्य वाटपाचे नियोजन केळस्कर सर आणि कुळे सर यांनी केले.

 

विशेष म्हणजे, गेल्या शैक्षणिक वर्षातही कोकण कट्टा व कै. शांताराम पाटील मेमोरियल ट्रस्टने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत केली होती. या सातत्यपूर्ण सामाजिक योगदानाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी संस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.

 

 


SEO Keywords :

तळवली हायस्कूल, कोकण कट्टा, कै. शांताराम पाटील मेमोरियल ट्रस्ट, गुहागर बातमी, रत्नागिरी शिक्षण, शालोपयोगी साहित्य वाटप, गरीब विद्यार्थ्यांना मदत, तळवली न्यूज, Ratnagiri News, Guhagar News


#Hashtags :

#Talwali #Guhagar #Ratnagiri #KokanKatta #Education #SchoolNews #StudentSupport #RatnagiriVartahar #MaharashtraNews

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup
1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें