गुहागरच्या आनंद जाधव यांना ‘राष्ट्रीय सामाजिक विकास दूत पुरस्कार-2026’; सामाजिक कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

गुहागरच्या आनंद जाधव यांना ‘राष्ट्रीय सामाजिक विकास दूत पुरस्कार-2026’; सामाजिक कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

शिव-प्रभा सामाजिक संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष आनंद शिवराम जाधव यांचा पुण्यातील ‘आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-2026’मध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मान

 

आबलोली | संदेश कदम

गुहागर तालुक्यातील कुडली गावचे सुपुत्र तसेच शिव-प्रभा सामाजिक संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष आनंद शिवराम जाधव यांना पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-2026’ मध्ये ‘राष्ट्रीय सामाजिक विकास दूत पुरस्कार-2026’ प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने राष्ट्रभक्ती परिवार, वसुधैव कुटुंबकम् जनसेवा फाउंडेशन, विजेता मीडिया आणि सायबर भारत न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि आदर्श कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

 

या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून भूषण प्रल्हादराव सुने, भारतीताई रमेश तुपे, सुभाष डेनकर, अश्विनी अशोक पाटील, गणपत गायकवाड, राजेंद्र पवार, पांडुरंग पिसे, ह.भ.प. दिलीप महाराज ठाकरे, किशोर थोरात, अनिता विष्णू वाघमारे, अशोक विष्णुपंत बेलापुरकर तसेच प्रसिद्ध निवेदक व कवी संदीप बापू रासकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आणि काव्यमय निवेदन संदीप बापू रासकर यांनी केले. त्यांच्या ओघवत्या शैलीने उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण सोहळ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन विजेता मीडिया यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.

 

गुहागर तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या आनंद शिवराम जाधव यांच्या या सन्मानाबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

राहुल गांधींकडून उपोषण सोडवण्यासाठी प्रतिसादच मिळाला नाही; सोनम वांगचुक यांचा मोठा दावा २६ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांचा खुलासा; काँग्रेसकडून ट्रोलिंगचा आरोप, सरकारशी ‘मिडनाईट डील’ झाल्याचेही फेटाळले

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें