दुर्गादेवी देवस्थानतर्फे १०३ विद्यार्थिनींचा चेक देऊन सन्मान; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा दिला संदेश7

दुर्गादेवी देवस्थानतर्फे १०३ विद्यार्थिनींचा चेक देऊन सन्मान; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा दिला संदेश

तवसाळ तांबडवाडीसह परिसरातील शाळांचा सहभाग; निर्मल ग्रामपंचायत काताळे येथे सोहळा उत्साहात

काताळे (गुहागर):

गुहागर तालुक्यातील श्री दुर्गादेवी देवस्थानच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या राष्ट्रीय अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी निर्मल ग्रामपंचायत काताळे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडीसह बिट स्तरावरील १०३ विद्यार्थिनींना धनादेश (चेक) देऊन सन्मानित करण्यात आले.

हा विशेष सन्मान सोहळा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे राष्ट्रीय संयोजक मा. राजेंद्रजी फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि श्री दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष मा. किरणजी खरे व सचिव मा. मावळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.

विविध शाळांचा उत्स्फूर्त सहभाग

या उपक्रमात पडवे बीट स्तरावरील विविध शाळांमधील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यामध्ये तवसाळ तांबडवाडी, बाबरवाडी, तवसाळ खुर्द, पडवे मराठी, पडवे उर्दू, काताळे नवानगर, काताळे नं. १, सडे जांभारी, कुंडली गावातील सर्व शाळा तसेच आबलोली येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थिनींचा समावेश होता. या सर्व मुलींना देवस्थानच्या वतीने धनादेश देऊन प्रोत्साहन देण्यात आले.

महिला पालकांचाही दुर्गादेवीचा प्रसाद म्हणून सन्मान

विद्यार्थिनींसोबत आलेल्या महिला पालकांना श्री दुर्गादेवीचा आशीर्वाद आणि प्रसाद म्हणून विशेष सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला पडवे केंद्रप्रमुख चिपळूणकर सर, गुहागर पंचायत समितीचे उपसभापती श्री निलेशजी सुर्वे, निर्मल ग्रामपंचायत काताळेच्या सरपंच (प्रशासक) सौ. प्रियंका सुर्वे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवस्थानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता रण्यात आली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

भरत गोगावले रायगडचे नवे पालकमंत्री; शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य  : पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाडसह रायगडमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून जल्लोष; जिल्ह्याच्या विकासाला वेग मिळण्याची अपेक्षा

Horoscope

Weather

और पढ़ें

भरत गोगावले रायगडचे नवे पालकमंत्री; शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य  : पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाडसह रायगडमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून जल्लोष; जिल्ह्याच्या विकासाला वेग मिळण्याची अपेक्षा

राज्य

शहर चुनें