मानवी मूल्यांची उंची गाठणारे डॉ. मधुसूदन घाणेकर

*मानवी मूल्यांची उंची गाठणारे डॉ. मधुसूदन घाणेकर

पुणे : तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेतर्फे १९ ऑगस्ट २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय एकपात्री जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या “सबकुछ मधुसूदन” या विश्वविक्रमी एकपात्री कार्यक्रमाचा ८५,००० वा प्रयोग सादर करण्यात आला. या प्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

डॉ. मधुसूदन घाणेकर यांना मानपत्र प्रदान करताना तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापक, अध्यक्ष प्रिया प्रमोद दामले यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. “जिथे रसिक, तिथे कार्यक्रम अशी व्यासपीठाची व्याख्याच त्यांनी ठरवली. १९६३ पासून भारतासह २० देशांत ८४,९९९ प्रयोग निरपेक्षपणे केले. दिव्यांग आणि वंचितांसाठी ५०,००० हून अधिक विनामूल्य प्रयोग केले. विविध क्षेत्रांत ३०९ विश्वविक्रम केले आहेत. पण याहीपेक्षा त्यांच्यातील माणूसपण हे नक्कीच अधिक श्रेष्ठ ठरले आहे,” असे उद्गार त्यांनी काढले. मानपत्राचे शब्दांकन करून त्याचे वाचन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.

 

याप्रसंगी डॉ. मधुसूदन घाणेकर संपादित “डहाळी” या विश्वविक्रमी अनियतकालिकाचा ११६५ वा विशेषांक तसेच प्रिया दामले लिखित “सबकुछ मधुसूदन या एकपात्री कार्यक्रमाचा ८५,००० वा प्रयोग” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला रंगकर्मी आणि नाट्य लेखक सुहास वाळुंजकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर, मराठी साहित्य व कला सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर, तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या बालसचिव एम. अजया, मधुरंग संस्थेच्या उपाध्यक्ष मेघना मधुसूदन घाणेकर, वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष वसुधा नाईक, डॉ. राजेन्द्र भवाळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नीला विद्वांस, मधुकर्णिका फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मधुकर्णिका सासवडे, कवयित्री शैलजा सोमण, दीपाराणी गोसावी, कवीराज विजय सातपुते, विनोद अष्टुळ, नंदकिशोर गावडे, प्रा. शरदचंद्र काकडे देशमुख, गौरव पुंडे, प्रमोद कुलकर्णी, भालचंद्र शिर्के, शीला इंदापुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा जाधव यांनी केले. प्रिया दामले यांनी प्रास्ताविक करून अतिथींचे स्वागत केले. यावेळी ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या मासिक कवी संमेलनाची घोषणा करण्यात आली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

भरत गोगावले रायगडचे नवे पालकमंत्री; शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य  : पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाडसह रायगडमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून जल्लोष; जिल्ह्याच्या विकासाला वेग मिळण्याची अपेक्षा

Horoscope

Weather

और पढ़ें

भरत गोगावले रायगडचे नवे पालकमंत्री; शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य  : पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाडसह रायगडमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून जल्लोष; जिल्ह्याच्या विकासाला वेग मिळण्याची अपेक्षा

राज्य

शहर चुनें