*राजापूरमधील डॉक्टरांचा विना परवाना औषध विक्रीचा पर्दाफाश, मुंबई FDA चे चौकशीचे आदेश,तसेच आरोग्य विभागाची सुद्धा करडी नजर*
♦ रत्नागिरी वार्ताहर इफेक्ट ♦
♥ सामाजिक कार्यकर्ते समीर शिरवडकर यांच्या तक्रारीनंतर FDA ची गंभीर दखल
*समिर शिरवडकर- रत्नागिरी
राजापूर :- तालुक्यातील काही डॉक्टर स्वतःच्या दवाखान्यातून विना परवाना औषध विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मुंबई येथील अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेत थेट चौकशीचे आदेश दिले आहेत.
*मुंबई FDA चे पत्र*
*जा.क्र. तक्रार-23/44-2026/88, दि. 29/08/2026*
*आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र, वांद्रे-कुर्ला, मुंबई*
सामाजिक कार्यकर्ते *श्री. समीर शिरवडकर* यांनी दिलेल्या तक्रारीनंतर FDA सह आयुक्त (गु.व.) श्री. व्ही.आर. रवी यांनी सह आयुक्त, FDA रत्नागिरी यांना आदेश दिले आहेत की, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील डॉक्टरांविरुद्ध आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल तातडीने मुंबई कार्यालयास सादर करावा.
पत्रात नमूद आहे की, राजापूर तालुक्यातील डॉक्टर रुग्णालयातूनच थेट औषधांची विक्री करत असून, त्यांच्याकडे वैध परवाना नाही. ही बाब रुग्णांच्या आरोग्याशी खेळणारी असून याप्रकरणी तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
*शिरवडकर यांची प्रतिक्रिया*
समीर शिरवडकर म्हणाले, सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू होता. प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. आता मुंबई FDA ने दखल घेतल्याने न्याय मिळेल असा विश्वास आहे. प्रशासनाने यापुढेही अशा प्रकारांवर कडक नजर ठेवावी. त्याचप्रमाणे काही डॉक्टरांना NRX आणि H1औषधे पुरविणाऱ्या काही राजापूर लांजा मधील ठराविक मेडिकल वितरकांनी सुद्धा कसून चौकशी करण्यात यावी.
पुढील तपास रत्नागिरी FDA कडून सुरू आहे.
त्याचप्रमाणे आरोग्य विभाग रत्नागिरी यांच्याकडून सुद्धा जिल्हा मधील PHC अंतर्गत असलेला सर्व दवाखाने, नर्सिंग होम, रुग्णालया,इतर आरोग्य सेवा बाबत विशेष तपासणी मोहीम दि.१० ऑगस्ट २६ ते १० ऑक्टोबर २६ राज्यव्यापी विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे सरकारने निर्देश दिले आहेत,
त्यानुसार सर्व आरोग्य विभागाच्या कायद्याचे पालन होत आहे का? या सर्व बाबी तपासून त्यावर कारवाई करून तसा अहवाल शासनाला पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील अनधिकृत काम करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.
तर ग्रामीण भागात जे डॉक्टर सेवा करतात ते तेथील नजीकच्या ग्रामीण रुग्णालय/प्राथमिक आरोग्य केंद्र येथील मोफत औषधे/गोळ्या आणून तेही ग्रामीण भागातील रुग्णांना विकत देत आहे . अशा डॉक्टर आणि रुग्णालया तील अधिकारी/कर्मचारी यांचीही चौकशी झाली पाहिजे अशी आता नागरिकांतून चर्चा सुरू आहे.










