बापर्डे येथे राणी लक्ष्मीबाई प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; बचत गटांच्या महिलांचे स्टॉल ठरले आकर्षण.

बापर्डे येथे राणी लक्ष्मीबाई प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; बचत गटांच्या महिलांचे स्टॉल ठरले आकर्षण.

बापर्डे (प्रतिनिधी) :प्रज्वल गायकवाड.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन झालेल्या ‘राणी लक्ष्मीबाई प्रभाग संघ बापर्डे’ ची वार्षिक सर्वसाधारण सभा (सन २०२५-२०२६) नुकतीच यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय, बापर्डे येथे उत्साहात पार पडली. या सभेला परिसरातील महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून, विविध गावांमधून जवळपास 600 बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रांगणात बचत गटाच्या महिलांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर उत्पादित केलेल्या विविध गृहउद्योगांच्या वस्तू व खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल मांडले होते. महिलांच्या या स्वावलंबी उपक्रमाचे व उत्पादनांचे उपस्थित मान्यवरांसह नागरिकांनी भरभरून कौतुक केले.

 

या कार्यक्रमास देवगड पंचायत समितीचे सभापती श्री. गणेश राणे, जिल्हा परिषद सदस्या सौ. अनवी तेली, पंचायत समिती सदस्या सौ. संजना लाड, सौ. आसरोंडकर मॅडम, तामणा गावच्या सरपंच श्रीमती कदम मॅडम तसेच बापर्डेचे सरपंच श्री. संजय लाड आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

श्री गणेश राणे (सभापती, पंचायत समिती देवगड) आपल्या अत्यंत प्रभावी आणि मार्गदर्शक मनोगतात सभापती श्री गणेश राणे यांनी सांगितले की, “ग्रामीण महिला जेव्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात, तेव्हा खऱ्या अर्थाने कुटुंबाचा आणि गावाचा विकास साधला जातो. देवगड पंचायत समितीच्या माध्यमातून बचत गटांच्या महिलांना अधिकाधिक उद्योगभिमुख करण्यासाठी, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आमचे शासन व प्रशासन नेहमीच कटिबद्ध आहे. महिलांच्या प्रगतीसाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.” त्यांच्या या ओघवत्या व प्रेरणादायी वक्तव्याने उपस्थितांची मने जिंकली.

सौ अनवी तेली (जिल्हा परिषद सदस्या) आपल्या प्रभावी मनोगतात सौ अनवी तेली यांनी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना सांगितले की, “आज बापर्डे येथे बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे स्टॉल पाहिल्यानंतर ग्रामीण महिलांच्या अफाट कौशल्याची आणि आत्मनिर्भरतेची खरी अनुभूती येते. महिला जेव्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहतात, तेव्हा संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा पाया मजबूत होतो. राणी लक्ष्मीबाई प्रभाग संघाच्या माध्यमातून महिलांना हक्काची व्यासपीठ आणि दिशा मिळत असून, अशा उपक्रमांना व महिलांच्या प्रत्येक विकासात्मक प्रयत्नांना जिल्हा परिषदेकडून नेहमीच पूर्ण सहकार्य व पाठबळ दिले जाईल.” त्यांच्या या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांची मने जिंकली.

 

सौ संजना लाड पंचायत समिती सदस्या म्हणाल्या, “आज बापर्डे प्रभाग संघाच्या या सभेत एवढ्या मोठ्या संख्येने महिला भगिनींना एकत्र पाहून मन आनंदाने भरून आले आहे. महिलांनी केवळ घरकाम न करता विविध गृहउद्योगांच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. बचत गट हे महिलांच्या जीवनात क्रांती घडवून आणण्याचे सर्वात मोठे माध्यम ठरत असून, महिलांच्या प्रत्येक पावलावर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.

बापर्डेचे सरपंच श्री संजय लाड आपल्या मनोगतात आवर्जून म्हणाले की, “आज आपल्या बापर्डे गावाला आणि ग्रामपंचायतीला आजवर जी वेगवेगळी यश व प्रतिष्ठा मिळाली आहे, त्या प्रत्येक यशात आपल्या गावातील बचत गट महिलांचे आणि त्यांच्या परिश्रमाचे खूप मोठे व मोलाचे योगदान आहे. महिलांच्या या सहभागामुळेच आज आमचे गाव विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे.”

या सभेचे आयोजन राणी लक्ष्मीबाई प्रभाग संघ बापर्डे अंतर्गत येणारे सर्व ग्रामसंघ—जसे की जिजामाता ग्रामसंघ (बापर्डे), आशा महिला ग्रामसंघ (जुवेश्वर), दीप महिला ग्रामसंघ (गढीताम्हाणे), विजया महिला ग्रामसंघ (रहाटेश्वर), हिरकणी ग्रामसंघ (पेंढरी), जागृती ग्रामसंघ (सोमलेवाडी), अहिल्या ग्रामसंघ (मणचे), आधार ग्रामसंघ (मुटाट), आदर्श ग्रामसंघ (पाळेकरवाडी), समता ग्रामसंघ (वाघोटन), प्रेरणा ग्रामसंघ (मळेगाव) आणि संजीवनी ग्रामसंघ (गोवळ)—तसेच प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौ प्रियंका प्रवीण राणे, सचिव सौ. प्राजक्ता प्रकाश तिलोंटकर, कोषाध्यक्ष सौ. साक्षी सजित कदम यांच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाग समन्वयक, ग्राम सखी, सी.आर.पी. बी.डी.एस.पी. ऑडिटर, प्रभाग संघ लिपिक आणि ग्रामसंघ लिपिक यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें